एकतर मी लढत नाही, लढलो तर हरत नाही : चंद्रकांत पाटील यांचा विश्‍वास

एकतर मी लढत नाही, लढलो तर हरत नाही : चंद्रकांत पाटील यांचा विश्‍वास

पुणे : एकतर मी लढत नाही, लढलो तर हारत नाही, आतापर्यंत लढविलेल्या कोणत्याही निवडणुकीत हरलो नाही. मी लढलो तर जिंकतोच. त्यामुळे या निवडणुकीतही कोथरूडकरांच्या सहकार्याने निश्‍चित विजयी होईन, असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडमधील पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

पाटील यांच्या प्रचाराची सुरवात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याने आज झाली. यावेळी बोलताना पाटील यांनी हा विश्‍वास व्यक्त केला. कोथरूडमधून पाटील यांना उमेदवारी मिळाल्यापासून पक्षातून आणि पक्षाबाहेरूनदेखील स्थानिक विरूद्ध बाहेरचा असा प्रचार सुरू झाला आहे.

समाज माध्यमातून याची मोठी चर्चा होत आहे. विरोधकांनीही त्याचा मोठा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पाटील यांनी विजयाबद्दल दाखवलेला विश्‍वास महत्वपूर्ण मानला जात आहे. उद्यापासून कोथरूडच्या बातम्या बंद होतील, असाही दावा त्यांनी केला. 

या मेळाव्याला विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी काहीशा उशीरा आल्या. त्यांच्या उशीरा येण्याती चर्चा मेळाव्यातील कार्यकर्त्यांत झाली. आमदार कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या नाराज असल्याच्या तसेच आजच्या मेळाव्यासाठी पक्षाच्यावतीने त्यांना कुणीही संपर्क केला नव्हता, अशा आशयाच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे त्यांच्या व्यासपीठावरील आगमनाची चर्चा झाली. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना मोठ्या बहुमतांनी निवडून आणण्याचा निर्धार यावेळी आमदार कुलकर्णी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com