गिरीश महाजनांच्या विधानाने उडाली नाशिकच्या आमदारांची झोप

भारतीय जनता पक्षाचे शहरात तीन आमदार आहेत. या तिन्ही जागांवर थोडे नव्हे तर तब्बल पंचेचाळीस जणांनी उमेदवारी मागीतली आहे. यामध्ये तिन्ही मतदारसंघात पक्षाचे वरिष्ठ नेते, मतदारसंघावर प्रभाव असलेले पदाधिकारी आणि दिग्गज मंडळी आहे. आमदारही त्यांना दुखावू शकत नाहीत, अशी मंडळी उमेदवारीसाठी तयारी करीत आहेत.
Devyani Farande - Balasaheb Sanap - Seema Hirey
Devyani Farande - Balasaheb Sanap - Seema Hirey

नाशिक : नुसते निवडून येणारा नव्हे सर्वाधीक मतांनी निवडून येऊ शकणाऱ्याला उमेदवारी देणार असे विधान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील इच्छुकांशी कानगोष्टी करतांना केले आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत व्यग्र असलेल्या बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे या तिन्ही आमदारांची झोप उडाली आहे. भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळणार की स्पर्धा करावी लागणार अशी चिंता या आमदारांना सतावत असल्याचे कळते.

भारतीय जनता पक्षाचे शहरात तीन आमदार आहेत. या तिन्ही जागांवर थोडे नव्हे तर तब्बल पंचेचाळीस जणांनी उमेदवारी मागीतली आहे. यामध्ये तिन्ही मतदारसंघात पक्षाचे वरिष्ठ नेते, मतदारसंघावर प्रभाव असलेले पदाधिकारी आणि दिग्गज मंडळी आहे. आमदारही त्यांना दुखावू शकत नाहीत, अशी मंडळी उमेदवारीसाठी तयारी करीत आहेत. मध्य मतदारसंघात माजी महापौर तथा विधीमंडळातील 'मनसे'चे माजी उप गटनेते वसंत गिते, पक्षाचे सरचिटणीस लक्ष्मण सावजी, माजी नगरसेवक विजय साने आणि सुरेश पाटील हे प्रमुख आहेत.

या चारही इच्छुकांचा पक्षावर तसेच मतदारसंघात मोठा संपर्क, नेटवर्क आणि मतदारांत लोकप्रियता आहे.  गिते यांच्या समर्थकांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. विद्यमान आणदारांबाबत भाजपने नुकताच एक सर्व्हे केला होता. त्यात शहरातील तिन्ही जागा पक्षासाठी अनुकुल आहेत. मात्र विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर आधारीत सर्व्हेक्षण सुरु आहे. त्याचे निष्कर्ष काय असतील याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

नाशिक मध्य मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दलित आणि मुस्लीम मतदारांची संख्या आहे. या मतदारांची संख्या निर्णायक आहे. अशा स्थितीत केवळ निवडून येणारा न्वहे तर सर्वाधीक मतांनी निवडून येण्याचा निकष लावल्यास त्यात विद्यमान आमदार देवयानी फरांदेंचा समावेष होईल की नाही? हे सर्वेक्षणावर ठरेल.

अशा स्थितीत गेले काही दिवस मतदारसंघात संपर्क मोहीम व वातावरण निर्मिती करण्यात व्यग्र असलेल्या देवयानी फरांदे यांच्यासाठी सर्व्हेक्षण अनुकुल ठरेल की नाही, याची उत्सुकता स्वतः आमदार तसेच त्यांच्या स्पर्धकांना आहे. अवघ्या काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे उमेदवारीविषयी जलसंपदा मंत्री महाजन यांनी केलेल्या विधानाने आमदारांची झोप उडणे स्वाभाविक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com