युतीचा फॉर्म्युला मंत्र्यांनाही माहिती नाही म्हणत गिरीश महाजनांनी संजय राऊतांना डिवचले

राजकारणातील सर्वात जुनी युती म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीकडे पाहिले जाते. अनेक वर्षापासून राजकारणात असलेल्या या युतीत कालौघात खटके उडू लागले आहे. मात्र, दोघात तिसरा नको या एकमेव कारणासाठी पटत नसले तरी, विरोधकांना दूर ठेवण्यासाठी युती टिकून आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तुटलेली युती पुन्हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून एकत्र आली आहे.
Girish Mahajan - Sanjay Raut
Girish Mahajan - Sanjay Raut

नाशिक : ''शिवसेना- भाजप युती आहेच. मात्र त्यावर कोणीही भाष्य करत सुटायचे नसते. तशा सुचनाही नाहीत. कारण याबाबत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना देखील काहीच माहिती नाही. अगदी नेत अन्‌ मंत्र्यांनाही त्याबाबत माहिती नाही. त्यामुळे कोणी युतीचा फॉर्मूला सांगत असेल तर त्यावर मी काय बोलू?'' असे सांगत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना डिवचले आहे.

राजकारणातील सर्वात जुनी युती म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीकडे पाहिले जाते. अनेक वर्षापासून राजकारणात असलेल्या या युतीत कालौघात खटके उडू लागले आहे.

मात्र, दोघात तिसरा नको या एकमेव कारणासाठी पटत नसले तरी, विरोधकांना दूर ठेवण्यासाठी युती टिकून आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तुटलेली युती पुन्हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून एकत्र आली आहे. मात्र, या वेळच्या युतीला कुठल्या फॉर्म्युल्याचा आधार आहे, हे मात्र जिल्हास्तरीय नेत्यांनाही माहित नाही. केवळ दोन्ही पक्षाचे नेते ठरवतील हेच प्रमाण मानून जिल्हा नेत्यांना सतरंज्या उचलण्यापलिकडे काहीही काम नाही. तरीही, जागावाटपाबाबत मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यात धुम्मस सुरूच असल्याचे चित्र आहे.

राज्यात युती झाली तेव्हापासून शिवसेना 171 भाजप 117 असे जागावाटपाचे सुत्र होते. अनेक वर्षे ते सुरु होते. भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत युतीचा फॉर्म्युला बाद ठरविला. यंदा तर पक्षातील उच्च पदस्थाशिवाय कुणालाही जागावाटपाचे सुत्र माहिती नाही. त्यामुळे जागावाटपावरून कायम कलगीतुरा रंगू लागला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी निम्म्या- निम्म्या जागांवर युतीचे सूत्र ठरले अशी माहिती दिली होती. त्याचा समाचार घेत जलसंपदा गिरीश महाजन यांनी नेमके उलटे सूर आळविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com