नाशिक शहरात रेशनच्या तक्रारींसाठी राष्ट्रवादीच्या ४०० स्वयंसेवकांचा राबता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विभागाकडून विविध योजना आखण्यात आलेल्या आहे. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमधून अल्पदरात अन्न धान्याचे वाटप करण्यात येत आहे
Four Hundred NCP Workers working as Volunteers in Nashik
Four Hundred NCP Workers working as Volunteers in Nashik

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विभागाकडून विविध योजना आखण्यात आलेल्या आहे. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमधून अल्पदरात अन्न धान्याचे वाटप करण्यात येत आहे.

तसेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. या अन्नधान्याच्या वाटपामध्ये रेशन दुकानदार व लाभार्थी यांच्यातील अडचणी सोडविण्यासाठी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सुमारे चारशे समन्वयकांच्या नेमणुका केल्या आहेत.

रेशन वाटपास सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न 

यामध्ये रेशन वाटप करतांना लाभार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवणे, त्यांना आरोग्य विषयक माहिती देणे, रेशन दुकांदारांकडून निर्धारित केलेल्या वेळेत दुकाने उघडली जातात की नाही याची पाहणी करणे, रेशन वाटपात येणाऱ्या अडचणी समजून घेणे, शासनाच्या योजनेप्रमाणे लाभार्थ्यांना वाटप होतंय की नाही याची पाहणी करणे, रेशन दुकानदारांच्या अडचणी समजून घेणे, रेशन पुरवठ्याबाबत वाहतुकीच्या येणाऱ्या अडचणींचा निपटारा करणे, रेशन दुकांदाराकडून काळाबाजार होत असल्यास लक्ष ठेवणे त्याचबरोबर कारण नसतांना रेशन दुकानदारांना त्रास देणाऱ्यांना पायबंद घालण्याचे काम या समन्वयकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

अडचणी योग्य मार्गाने मार्गी लावण्याची व्यवस्था

समन्वयकांच्या  माध्यमातून येणाऱ्या अडचणी प्रथम विभाग अध्यक्षांना प्राप्त होतात. त्यानंतर त्या शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून या अडचणी सोडविल्या जात आहे. यासाठी व्हाॅट्सअप ग्रुप तयार करण्यात आले असून काही अडचणी सोडविण्यासाठी शहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अडचणी सोडवितात व त्याची माहिती छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्यापर्यंत पोहचविली जात आहे. त्यामुळे शहरात रेशन वाटपाबाबत येणाऱ्या अडचणींचा त्या त्या दिवशी तात्काळ निपटारा केला जात आहे.

हे देखिल वाचा : अजित पवार, जयंत पाटील यांनी फिरले पाहिजे : विनोद तावडेंची अपेक्षा

पुणे :"कोरोनाच्या काळात सरकारकडून होत असलेल्या घोषणांची अंमलबजावणी  होते का? हे पाहण्यासाठी नेत्यांनी फिल्डवर आले पाहिजे. आता फक्त घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात काहीही होत नाही," अशी टिका माजी मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com