कोरोना इफेक्ट... `या' शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकार कसा मार्ग काढणार?

"कोरोना'च्या पार्श्वभूमीवर स्थानिक आठवडेबाजार बंद केले असतानाच आता शहरातील बाजार समित्याही धडाधड बंद होण्याचा निर्णय होत आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
"कोरोना'च्या दहशतीमुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांची हतबलता वाढली आहे. त्यामुळे शासनाने मार्ग काढावा अशी मागणी होत आहे.
"कोरोना'च्या दहशतीमुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांची हतबलता वाढली आहे. त्यामुळे शासनाने मार्ग काढावा अशी मागणी होत आहे.

श्रीगोंदे : "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर स्थानिक आठवडेबाजार बंद केले असतानाच आता शहरातील बाजार समित्याही धडाधड बंद होण्याचा निर्णय होत आहे. परिणामी श्रीगोंद्यातील फळ व भाजीपाला पिकवणारे शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. मोठा खर्च करून आलेले पीक फेकून देण्याची वेळ येते की काय, या भीतीने शेतकरी हतबल दिसत आहेत.
 
"कोरोना'चे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसले आहे. तालुक्‍यात द्राक्ष, संत्रा, कलिंगड, खरबूज व वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकवणारा विशिष्ट शेतकरीवर्ग आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून पिकवलेले हे पीक आज कुठे विकायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पक्व झालेला माल शेतातच ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

कलिंगड, खरबूज, द्राक्षे, टोमॅटो, वांगी व इतर भाजीपाला वेळेत शेतातून बाहेर काढला नाही, तर तो विकण्यायोग्य राहत नाही. ही पिके बाजारात नेण्यासाठी तयार असतानाही "कोरोना'च्या दहशतीमुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांची हतबलता वाढली आहे. 

बियाणे, लागवड, औषध फवारणी आणि काढणी यासाठी मोठा खर्च येतो. दराची शाश्वती नसताना शेतकरी या पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च करतोय, मात्र आता हातातोंडाशी आलेला घास कोरोना हिरावून घेतोय. दहा रुपये किलो भावाचे कलिंगड रस्त्यावर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली; मात्र त्यालाही ग्राहक भेटत नसल्याने अडचणीत अजूनच भर पडत आहे. यातून शासनाने शेतकरीहिताचा काही तरी मध्यम मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे.

शासनाने विचार करावा - काकडे
लोणी व्यंकनाथ येथील शेतकरी राजेंद्र काकडे म्हणाले, ""कोरोनाच्या रुग्णाएवढीच वाईट अवस्था शेतात फळबाग आणि भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्याची आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून पिके पोटच्या पोराप्रमाणे वाढवली; मात्र आज ती सोडून देण्याची वेळ आली आहे. शासनाने या शेतकऱ्यांचा विचार करून ही पिके विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com