व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य पर्यटकांसाठी आजपासून बंद

देशात कोरोनाच्या प्रादूर्भावाचा धोका लक्षात घेता राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने पर्यटनासाठी आजपासून बंद करण्यात आले आहेत.
देशात कोरोनाच्या प्रादूर्भावाचा धोका लक्षात घेता राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने पर्यटनासाठी आजपासून बंद करण्यात आले आहेत.
देशात कोरोनाच्या प्रादूर्भावाचा धोका लक्षात घेता राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने पर्यटनासाठी आजपासून बंद करण्यात आले आहेत.

नागपूर : देशात कोरोनाच्या प्रादूर्भावाचा धोका लक्षात घेता राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने पर्यटनासाठी आजपासून बंद करण्यात आले आहेत. व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने तसेच अभयारण्याला देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात. त्यांच्या संपर्कात येणारे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना या विषाणूची लागण होण्याची शक्‍यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत जंगल सफारी बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी सांगितले.

राज्यामध्ये कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पर्यटनासाठी मोठया प्रमाणात लोकांचे समूह येत असतात. अशा ठिकाणी या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता जास्त असल्याने दक्षता घेण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच विविध जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी 31 मार्चपर्यंत विविध क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रे बंद ठेवण्यासाठी आदेश काढले आहेत. 

काही ठिकाणी असे आदेश निर्गमीत होत आहेत. देशातील काही राज्यांमध्ये देखील व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यातील पर्यटनास बंदी घातली आहे. काही व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यास विविध भागातून येणारे देशी- विदेशी पर्यटक भेटी देत असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना सुध्दा या विषाणूची लागण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला आहे.

रेल्वेच्या एसी डब्यातील ब्लॅंकेट, पडदे निघाले
जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच शृंखलेत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानेसुद्धा उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागपूर विभागामार्फत संचालित केल्या जाणाऱ्या दुरांतोसह अन्य गाड्यांच्या वातानुकूलित डब्यांमधून ब्लॅंकेट आणि पडदे काढून घेण्यात आले आहेत.

रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या दररोज लाखोंच्या घरात असते. वातानुकूलित डब्यांमध्ये प्रवाशांना चादर, ब्लॅंकेट दिले जाते. शिवाय पडदेसुद्धा असतात. प्रत्येक उपयोगानंतर चादरी धुतल्या जातात. ब्लॅंकेट 15 दिवसांतून एकदाच धुतले जातात. पडद्यांच्या स्वच्छतेचाही तसाच क्रम असतो. अशा स्थितीत कोरोनाच्या विषाणूचा त्यातून प्रसार होण्याचा धोकाही वाढतो. हीच शक्‍यता लक्षात घेता मुंबई दुरांतो, सेवाग्राम आणि पुणे एक्‍स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांमधून ब्लॅंकेट व पडदे हटविण्यात आले आहेत.

ब्लॅंकेट नसल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने डब्यातील तापमानावरही सतत लक्ष ठेवले जाईल. प्रवाशांना थंडी लागणार नाही, एवढेच तापमान डब्यात ठेवले जाणार आहे. त्यातही एखाद्या प्रवाशाने मागणी केल्यास त्याला अतिरिक्त चादर उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय प्रवाशांच्या सतत संपर्कात येणारा डब्यातील भाग म्हणजे खिडकी, हॅंडल, बाथरूम, नळाचे सॅनिटायझरच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले जात आहे. स्वच्छतेवर विशेषत्वाने भर दिला जात आहे. सहायक विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com