भाजपमध्ये सध्या केवळ व्यक्तीपूजा : एकनाथ खडसे

भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती पूर्वी सारखी राहिलेली नाही, अशी खंत माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे
Ekanath Khadase Unhappy About BJP Party Affairs
Ekanath Khadase Unhappy About BJP Party Affairs

जळगाव : भारतीय जनता पक्षात पूर्वी सांघिकपणे कामे केली जात होती, आता मात्र केवळ व्यक्तीपूजा केली जात आहे,  असा सणसणीत टोला पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या सध्याच्या कारभाराला उद्देशून लगावला. 

एकनाथ खडसे दिल्लीला गेले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांची ते भेट घेणार आहेत. आज एका वाहिनीला मुलाखत देतांना ते म्हणाले, ''भाजपमध्ये जेष्ठ नेत्यांना बाजूला टाकले जात आहे, असे मी म्हणणार नाही.  परंतु, पक्षात अगोदर सांघिक चर्चा केली जात होती. मात्र, आता कोणीही चर्चा करण्यास तयार नाही. चर्चा तर सोडाच साधे बोलतही नाहीत. अॅड.रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगर मतदार संघात पराभव झाला. आपला पराभव कसा झाला? कोणती कारणे आहेत, याबाबत जेष्ठ नेत्यांनी साधा कोणी फोन करूनही विचारणा केली  नाही."

वेगळा पर्याय म्हणजे पक्ष सोडणेच नव्हे...

पक्षाचा वेगळा पर्यायाचा विचार म्हणजे, केवळ पक्ष सोडणेच नव्हे असे सांगून ते म्हणाले, ''मी पक्षाच्या संघटनेत काम करू शकतो. किंवा फक्त कार्यकर्ता म्हणूनही काम करू शकतो. दिल्लीत मी केवळ नेत्यांच्या भेटीसाठी आलेलो नाही. आज  मतदार संघातील कामासाठी आलेलो आहोत. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहे. जर आज भेट झाली नाही तर उद्या ही भेट घेणार आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com