एकनाथ खडसे दिल्ली भेटीत कुणाला चव्हाट्यावर आणणार?

माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथ खडसे आज कर्नाटक एक्सप्रेसने नवी दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या या दिल्लीवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.आता दिल्ली भेटीत ते भाजप पक्षश्रेष्ठांशी भेट घेऊन आपल्या मनातली खदखद मांडणार की आणखी काही वेगळा विचार करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
Ekanath Khadase Going To Delhi
Ekanath Khadase Going To Delhi

जळगाव : माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथ खडसे आज कर्नाटक एक्सप्रेसने नवी दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या या दिल्लीवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीच्या दिवशी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समोर खडसे यांनी आपल्यावर पक्षातील काही नेत्यांकडून सातत्याने अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली होती,चाळीस वर्षे पक्ष उभारणीत मोठं योगदान असत्तानाही जर यापुढे ही असच होत राहिल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा च त्यांनी दिल्याने मोठी खळबळ उडाली होती, या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथराव खडसे हे काल कर्नाटक एक्सप्रेसने दिल्ली येथे रवाना झाले आहेत. ते दिल्लीत आता कोणाची भेट घेतात आणि कोणत्या विषयावर आपली भूमिका मांडतात ,याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पक्षांतर्गत कुरघोड्यांबाबत माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. पक्षाने मला परवानगी दिली तर पत्रकार परिषद घेऊन मी ते पुरावे सर्वांसमक्ष जाहीर करेन, असे खडसे यांनी गेल्याच आठवड्यात सांगितले होते. मला पक्षाच्या कोअर कमेटीवरून काढण्यात आले, पदावरून काढण्यात आले. मला जाणीवपूर्वक पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही मी यांची आरती करावी काय ? माझा पक्ष सोडण्याचा अद्यापही विचार नाही. परंतु जर वारंवार असाच अन्याय होत राहिल्यास मला पक्षाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असेही खडसे म्हणाले होते. 

आता दिल्ली भेटीत ते भाजप पक्षश्रेष्ठांशी भेट घेऊन आपल्या मनातली खदखद मांडणार की आणखी काही वेगळा विचार करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com