खासदाराच्या मुलाचे वडील कोण?; अखेर जन्म दाखल्यावरून झाला खुलासा

नुसरत यांनी 2019 मध्ये उद्योगपती निखील जैन यांच्याशी तुर्कीमध्ये विवाह केला होता.
Yash Dasgupta is Nusrat Jahans sons father
Yash Dasgupta is Nusrat Jahans sons father

कोलकता : अभिनेत्री व तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या मुलाच्या जन्म नोंदणीची माहिती समोर आली आहे. कोलकता महापालिकेकडील कागदपत्रांनुसार मुलाचे नाव ईशान जे दासगुप्ता असं लिहिलेलं आहे. तर वडिलांच्या नावासमोरील रकान्यात देवाशिष दासगुप्ता हे नाव आहे. पश्चिम बंगालमधील प्रसिध्द अभिनेता यश दासगुप्ता यांचं हे नाव आहे. (Yash Dasgupta is Nusrat Jahans sons father)

नुसरत जहाँ व यश दासगुप्ता यांचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होती. पण नुसरत यांनी 2019 मध्ये उद्योगपती निखील जैन यांच्याशी तुर्कीमध्ये विवाह केला होता. पण काही महिन्यांतच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर 2020 मध्ये ते वेगळे झाले. त्यावरून बराच वादही निर्माण झाला होता. यानंतर काही दिवसांतच नुसरत यांनी गर्भवती असल्याचं जाहीर केलं होतं.

ते वेगळे झाल्यानंतर यश व नुसरत यांच्या भेटी वाढल्याची चर्चा होती. नुसरत यांनी 26 ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला आहे. त्यानंतर त्यांना मुलाच्या वडिलांविषयी विचारण्यात आले होते. पण त्यांनी वडिलांचे नाव सांगण्यास नकार दिला होता. पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, 'मुलाचे वडील कोण, असा प्रश्न विचारून एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर काळा डाग लावणं खूपच सोपं असतं.' मागील 20 दिवस नुसरत यांनी मुलाच्या वडिलांबाबत स्पष्ट केलं नव्हतं. 

आता महापालिकेमध्ये बाळाच्या जन्माच्या नोंदीची माहिती समोर आली आहे. त्यावरून यश दासगुप्ता हे नुसरत यांच्या मुलाचे वडील असल्याचे स्पष्ट झालं आहे. यश दासगुप्ता हे बंगालमधील अभिनेते आहेत. अनेक बंगाली चित्रपटांसह मालिकांसह काही हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटामध्ये नुसरत व यश यांनी एकत्रित काम केलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com