ममतांच्या पोटनिवडणुकीपूर्वी पक्षाच्या खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

घोष यांनी अचानक राजीनामा दिल्यानं पक्षातील अनेक नेत्यांनाही धक्का बसला आहे.
Rajya Sabha TMC MP Arpita Ghosh Resigns
Rajya Sabha TMC MP Arpita Ghosh Resigns

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये पुढील काही दिवसांत विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वत: भवानीपूर मतदारसंघातून उमेदवार आहेत. त्यामुळं तृणमूल काँग्रेसनं या मतदारसंघातून ममतादीदींना विक्रमी मतांनी निवडूण आणण्यासाठी जोर लावला आहे. त्यातच पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार अप्रिता घोष यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. (Rajya Sabha TMC MP Arpita Ghosh Resigns)

राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी बुधवारी घोष यांचा राजीनामा स्वीकारला आहे. घोष यांनी अचानक राजीनामा दिल्यानं पक्षातील अनेक नेत्यांनाही धक्का बसला आहे. पक्ष आणि कुटूंबाकडं अधिक लक्ष देता यावं, यासाठी त्यांनी राजीनामा दिल्यांच पक्षाती एका नेत्यानं सांगितलं. संसद अधिवेशनादरम्यान गोंधळ घातलेल्या तृणमूलच्या खासदारांपैकी घोष या एक आहेत.

घोष यांना गोंधळ घातल्याबद्दल निलंबितही करण्यात आलं होतं. संसदेच्या दरवाजाला लाथ मारून काच फोडल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. तसेच राज्यसभेत झालेल्या गोंधळावेळी मार्शल व खासदारांमध्ये झटापट झाली होती. यामध्ये घोष यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप मार्शल्सनी केला होता. ममता बॅनर्जी यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या नंदीग्राम मतदारसंघातून घोष यांनी राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली होती. 

घोष यांना 2014 मध्ये पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. पण 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांच्यावर दक्षिण दिनाजपूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. उत्तर बंगालमध्ये 2019 मध्ये भाजपला मोठं यश मिळालं होतं. यावेळी घोष यांनी त्यांच्या जिल्ह्यात पक्षाची पकड कायम ठेवली होती.

मार्च 2020 मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आलं होतं. पण दीड वर्षांतच त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीपेक्षा बंगालमध्ये आपली जास्त गरज असल्याचे त्यांना वाटते, असे सुत्रांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाकडून मोठे फेरबदल केले जात आहेत. त्याचाच हा भाग असल्याचं बोलले जात आहे. घोष यांच्याकडं पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com