जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी करणारं महाकाय जहाज पुन्हा सुएझ कालव्यात..

सुएझ कालव्यात एव्हर गिव्हन हे महाकाय मालवाहू जहाज अडकल्यानेजगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी झाली होती.
worlds biggest ship ever given crosses suez canal again
worlds biggest ship ever given crosses suez canal again

सुएझ : सुएझ कालव्यात (Suez Canal) अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन (Ever Given) हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर 29 मार्चला दुसरीकडे हलवण्यात यश आले होते. यामुळे जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी अखेर सुटली होती. परंतु, नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर या जहाजाची झालेली कोंडी झाली होती. अखेर हे जहाज तब्बल १२९ दिवसानंतर मुक्कामाच्या ठिकाणी रॉटरडॅम येथे पोचले होते. हे जहाज पुन्हा एकदा सुएझ कालव्यात आले. 

एव्हर गिव्हन हे जगातील सर्वांत मोठे मालवाहू जहाज आहे. हे जहाज 400 मीटर (1 हजार 312 फूट) लांबीचे आहे. हे जहाज काल (ता.20) पुन्हा एकदा सुएझ कालव्यात आले. हे जहाज ब्रिटनहून चीनला जात आहेत. या जहाजासोबत इतर 26 जहाजेही होती. सुएझ कालवा प्राधिकरणाचे वरिष्ठ पायलट आणि दोन टगबोटींच्या सहाय्याने या जहाजाने सुएझ कालवा पार केला. हे जहाज पुन्हा सुएझ कालव्यात आल्यानंतर सर्वांनीच श्वास रोखून धरला होता. हे जहाज कालव्यातून पुढे गेल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुएझ कालवा प्राधिकरणाने हे जहाज कालवा पार करीत असतानाचा व्हिडीओही ट्विट केला आहे. 

एव्हर गिव्हन हे 2 लाख टनांचे महाकाय जहाज 23 मार्चला सुएझ कालव्यात अडकले होते. आठवडाभरानंतर म्हणजेच 29 मार्चला अथक प्रयत्नांनंतर हे जहाज अखेर बाहेर काढण्यात यश आले होते. या जहाजामुळे आशिया आणि युरोपकडे दररोज जाणाऱ्या तब्बल 9.6 अब्ज डॉलरच्या मालाची वाहतूक थांबली होती. याचबरोबर सुएझ कालवा बंद पडल्याने इजिप्तला दररोज सुमारे 12 ते 15 दशलक्ष डॉलरचा फटका बसला होता. 

या नुकसानीमुळे  सुएझ कालवा प्राधिकरणाने हे जहाज रोखून धरले होते. हे जहाज जप्त करीत जहाजाच्या कंपनीकडे तब्बल 90 कोटी डॉलरची मागणी केली होती. कंपनीने ही नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने हे जहाज कालवा प्राधिकरणाने जप्त केले होते. दरम्यान, जहाजाची कंपनी शोई कायसेन कैशा, कालवा प्राधिकरण आणि विमा कंपनी यांच्यात यावर चर्चा होती. यातून तोडगा न निघाल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते. अखेर कालवा प्राधिकरण आणि जहाज कंपनीत तडजोड झाली होती.    

या जहाजावरील सर्व 25 कर्मचारी भारतीय होते. हे जहाज रॉटरडॅम येथे चार महिन्यानंतर पोचले होते. या जहाजावरून माल उतरवण्यात आला होता. एव्हरगिव्हन जहाज पाहून हायसे वाटल्याचे रॉटरडॅम बंदराच्या संचालकांना म्हटले होते. या जहाजातून माल उतरवल्यानंतर काही दिवस ते तेथे थांबले. त्यानंतर हे जहाज फ्रान्सला रवाना झाले आणि तेथे त्याची तपासणी झाली. तपासणीनंतर या जहाजाचा पुन्हा प्रवास सुरू झाला आहे. आता हे जहाज ब्रिटनहून चीनकडे जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com