बंदुकधारी तालिबान्यांसमोरच महिला उतरल्या रस्त्यावर; जगभरात होतंय कौतुक

महिलांना घराबाहेर पडण्यासह शिक्षण, पेहराव अशा अनेक बाबतींत बंधने घालण्यात आली आहेत.
Women took to the streets in Kabul to protest against Taliban
Women took to the streets in Kabul to protest against Taliban

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता स्थापन केली आहे. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) देश सोडून पळाले आहेत. इतर अनेकांनी देशातून पलायन केलं असून अनेक जण देश सोडण्यासाठी झगडत आहेत. पण काही महिलांनी तालिबान्यांची दहशत झुगारून आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. (Women took to the streets in Kabul to protest against Taliban) 

तालिबानने रविवारी (ता. 15) अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पाऊल ठेवल्यानंतर संपूर्ण जग हादरून गेलं. त्यानंतर दोनच दिवसांनी तिथे महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले. महिलांना घराबाहेर पडण्यासह शिक्षण, पेहराव अशा अनेक बाबतींत बंधने घालण्यात आली आहेत. येथील महिलांना 20 वर्षांपूर्वीच्या तालिबानी राजवटीचा कटू अनुभव आहे. पुन्हा अशीच राजवट लागू होणार असल्याने अनेक महिला भयभीत झाल्या आहेत. 

अफगाणिस्तानमधील पहिल्या आणि सर्वात तरूण महिला महपौर जरीफा गफारी यांचीही हीच स्थिती झाली आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना गफारी म्हणाल्या, मी घरी बसले आहे आणि तालिबान्यांच्या येण्याची वाट पाहतेय. इथे कोणीही माझी आणि माझ्या कुटूंबाची मदत करण्यासाठी नाही. ते लोक माझ्यासारख्या लोकांसाठी येतील आणि आम्हाला मारतील.' तर दुसरीकडे मात्र काही महिलांनी तालिबान्यांच्या दहशतीला न घाबरता आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरत एकप्रकारे इशाराच दिला आहे. 

सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काबूलमधील रस्त्यावर चार अफगाण महिला दिसत आहेत. त्यांच्या हातात आपल्या मागण्यांबाबतचे फलक आहेत. तर त्यांच्याभोवती हातात बंदूक असलेले तालिबानी फिरत आहेत. पण त्यांच्या दहशतीला न घाबरता या महिला जागेवरच आपल्या मागण्यांसाठी उभ्या आहेत. सामाजिक सुरक्षा, कामाचा अधिकारी, शिक्षणाचा अधिकार तसेच राजकीय सहभाग आदी मागण्यां त्या करताना दिसतात. 

दरम्यान, काबूलमध्ये सध्या असलेल्या गोंधळाच्या वातावरणाला घनी यांचे पलायन कारणीभूत आहे. अमेरिकेसह तिचे सहकारी देश आणि भारताला अफगाणिस्तानमधील आपले अधिकारी आणि कर्मचारीही वेळेत बाहेर काढणे शक्य झाले नाही. काबूल विमानतळावर काल अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सरकारचीही नाचक्की झाली आहे. घनी हे आधी झालेल्या कराराप्रमाणे वागले असते तर सर्वच गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या असत्या. परंतु, ते अफगाणिस्तान, तेथील जनता आणि इतर देशांना तोंडावर पाडून पळून गेले. यामुळे सर्वच गोष्टी बिघडल्या आहेत, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com