कोण आहेत सुखजिंदरसिंग रंधावा? काँग्रेस नेतृत्व 'या' नेत्याला देणार शह

गुरूदासपूरमध्ये राहणारे 62 वर्षीय सुखजिंदरसिंग रंधावा यांचं कुटूंबीय अनेक वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहे.
Who is Punjab new CM Sukhjinder Singh Randhawa
Who is Punjab new CM Sukhjinder Singh Randhawa

चंदीगड : गुजरातमध्ये भाजपने धक्का दिल्यानंतर पंजाबमध्येही काँग्रेसनं धक्कातंत्र अवलंबलं आहे. बड्या नेत्यांच्या नावांवर फुली मारत अखेर आमदार सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आल्याचं समजतं. रंधावा हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिध्दू यांचे समर्थक मानले जात आहेत. (Who is Punjab new CM Sukhjinder Singh Randhawa)

अमरिंदरसिंग यांच्या जागी कोण, अशी चर्चा सुरू होती. यात माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, प्रतापसिंग बाजवा, अंबिका सोनी आणि राजकुमार वेर्का यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. पंजाब काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आमदार सुखजिंदरसिंग रंधवा यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी शिफारस केली आहे. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दिल्लीत झालेल्या बैठकीत रंधावा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. बैठकीला पंजाबमधील खासदार अंबिका सोनी याही उपस्थित आहेत.

गुरूदासपूरमध्ये राहणारे 62 वर्षीय सुखजिंदरसिंग रंधावा यांचं कुटूंबीय अनेक वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. रंधावा हे अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री होते. ते 2017 मध्ये डेरा बाबा नानक विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झाले. पंजाब काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांचे वडील संतोख सिंग हे दोनवेळा पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष होते. 

सिध्दू यांनी काँग्रेसमध्ये अमरिंदरसिंग यांच्याविरोधात मोर्चा उघडल्यानंतर रंधावा हेही त्यात सहभागी झाले. 2017 मध्ये दिलेली आश्वासनं पाळण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी सुरू केली. मात्र सुरूवातीला ते अमरिंदरसिंग यांच्या अंत्यत जवळचे नेते मानले जात होते. सिध्दू यांच्या गोटात आल्यानंतर त्यांनी उघडपणे अमरिंदरसिंग यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली होती. 

सुखजिंदरसिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्यानं हा अमरिंदरसिंग यांच्यासाठी थेट इशारा मानला जात आहे. तर सिध्दू यांच्या गोटातील नेता मुख्यमंत्री होणार असल्यानं त्यांना काँग्रेसनं बळ दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे अमरिंदरसिंग आणि सिध्द यांच्यातील वाद यापुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com