देशातील लशीच्या तुटवड्यामुळे चिंताग्रस्त पंतप्रधानांनी घेतली 'सिरम'ची लस अन् म्हणाले...

अनेक देशांना सिरमकड़ून कोरोना लशीचा पुरवठा होत आहे. ब्रिटनमध्ये या लशीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरणावर परिणाम झाला आहे.
uk prime minister boris johnson takes astrazeneca covid vaccine jab
uk prime minister boris johnson takes astrazeneca covid vaccine jab

लंडन : ऑक्सफोर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड या लशीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करीत आहेत. ब्रिटनमध्ये लसीकरणासाठी या लशीचा वापर करण्यात येत आहे. मात्र, सिरमकडून पुरवठा कमी झाल्याने देशात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामुळे चिंतित झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी अखेर ही लस टोचून घेतली आहे.  

युरोपमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू ब्रिटनमध्ये झाले आहेत. ब्रिटनमध्ये सुमारे 1 लाख 26 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोना लसीकरण सुरू असून, या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याला सिरमकडून होणार लशीचा पुरवठा कमी झाल्याचे कारण आहे. कोरोना लसीकरणासाठी ब्रिटनला आणखी 17 लाख डोसची आवश्यकता आहे. सिरमकडून कमी झालेला पुरवठा आणि ब्रिटनमध्ये या लशीची पुनर्तपासणी करण्यात येत असल्याने ब्रिटनमध्ये लशीचा तुटवडा जाणवत आहे.  
 
आज ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सिरमची लस टोचून घेतली. मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मृत्यूशी लढा दिला त्याच लंडनमधील रुग्णालयात त्यांनी ही लस घेतली. यानंतर बोलताना ते म्हणाले की, लस टोचून घेताना मला काहीच जाणवले नाही. अतिशय जलदपणे मला लस टोचण्यात आली. ही तुमच्यासाठी अतिशय चांगली आणि तुमच्या कुटुंबासाठी तर त्याहून चांगली गोष्ट आहे. तुम्हाला सूचना मिळेल त्यावेळी तुम्ही नक्की लस घ्या. 

ब्रिटनमधील कोरोना लसीकरणात लशीचा कमी झालेला पुरवठा हा सर्वांत मोठा धोका आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मार्चपासून पुरवठ्यात आणखी मोठी कपात होऊ शकते. याबद्दल बोलताना जॉन्सन म्हणाले होते की, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून तांत्रिक कारणामुळे लशीचा पुरवठा होण्यास विलंब लागत आहेत. यात भारत सरकारचा काहीही संबंध नाही. मोठ्या प्रमाणात लशीचे उत्पादन घेत असल्याबद्दल सिरम इन्स्टिट्यूटचे मी आभार मानतो. आम्ही आठवड्यापूर्वी नियोजन केल्यापेक्षा कमी लशीचा पुरवठा होत आहे. 

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित असल्याचे सांगूनही युरोपातील अनेक देशांनी तिचा वापर थांबवला होता. काही देशांमध्ये ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे प्रकार झाल्याचे म्हणणे होते. यामुळे तेथे या लशीचा वापर तात्पुरता थांबवण्यात आला होता. युरोपमध्ये 50 लाख लोकांनी ही लस घेतली होती आणि त्यातील 30 जणांना त्रास झाला होती. याची तपासणी युरोपियन मेडिसीन्स एजन्सीकडून (ईएमए) याची तपासणी सुरू होती. अॅस्ट्राझेनेकाची लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे. तिचा रक्ताचा गुठळ्या होण्याशी काहीही संबंध नाही, अशी घोषणा युरोपियन मेडिसीन्स एजन्सीने केली आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com