ट्रम्प यांच्या समर्थनार्थ भाजपचे तेजस्वी सूर्या अन् अमित मालवीय मैदानात

अमेरिकेतील कॅपिटॉलवरील हल्ल्यानंतर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जगभरात वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचेनेते मात्र, ट्रम्प यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
tejasvi surya and amit malviya supports donald trump against twitter ban
tejasvi surya and amit malviya supports donald trump against twitter ban

वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवानंतर अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉलवर केलेल्या हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. आता ट्रम्प यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या आणि भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय मैदानात उतरले आहेत. 

भविष्यात हिंसाचाराला चिथावणी मिळण्याचा धोका असल्याने ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. कॅपिटॉलवरील हिंसाचार भडकण्यापूर्वी ट्रम्प यांनी ट्विटरवरून व्हीडिओ संदेशाद्वारे समर्थकांनी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांचे ट्विटरवर ८ कोटी ८७ लाख फॉलोअर असून, जगभरातील सर्वाधिक फॉलोअर असलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षाही त्यांचे फॉलोअर अधिक आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम यांनीही ट्रम्प यांचे अकाऊंट तात्पुरते बंद केले आहे. यावर ट्रम्प यांनी स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्याचे सूतोवाच केले आहे. 

तेजस्वी सूर्या हे प्रक्षोभक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी नुकत्याच झालेल्या हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी वादग्रस्त वक्तव्ये केली होती.  आता सूर्या  यांनी ट्विट केले असून, यात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला टॅग केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्या लोकशाहींना बड्या अनियंत्रित तंत्रज्ञान कंपन्यांपासून असलेला धोका ज्यांना समजत नाही त्यांनी आता जागे व्हावे. ते अमेरिकेच्या अध्यक्षांना असे करत असतील तर ते कुणालाही अशी वागणूक देऊ शकतात. लवकरच भारत याबाबतच्या नियमावलीचा आढावा घेईल आणि ते आपल्या लोकशाहीसाठी हितकारक ठरेल. 

भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल केलेले ट्विट ट्विटरने दिशाभूल करणारे ठरवले होते. आता मालवीय यांनी ट्विट केले असून, त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घालणे हा अतिशय चुकीचा प्रघात आहे. तंत्रज्ञान कंपन्या या आता नव्या सत्ताधीश झाल्या आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com