मुंबई पोलिसांचा एफआयआरच रद्द करा; सुशांतच्या बहिणींची उच्च न्यायालयात धाव

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन सुरू असलेला गदारोळ कायम आहे. सीबीआयने अद्याप त्याचा मृत्यू कशाने झाला हे उघड केलेले नाही.
sushant singh rajputs sisters moved to high court for quashing of fir against them
sushant singh rajputs sisters moved to high court for quashing of fir against them

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यासह 18 जणांना अटक केली आहे. रियाने सुशांतच्या दोन बहिणींविरोधात वांद्रे पोलिसांकडे तक्रार दिली होती. या आधारे एफआयआर दाखल करुन मुंबई पोलिसांनी तो केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग केला होता. या प्रकरणी सुशांतच्या बहिणींनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

सुशांतला त्याच्या बहिणींनी बोगस प्रिस्क्रिप्शन दिल्याप्रकरणी रियाने वांद्रे पोलिसांकडे 7 सप्टेंबरला तक्रार दिली होती. यात तिने सुशांतची बहीण मितू सिंह, प्रियांका सिंह, दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलमधील डॉ.तरुण कुमार यांच्यासह इतरांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा आणि टेलिमेडिसीन प्रॅक्टीस गाईडलाईन्सनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. रियाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, डॉ.तरुण कुमार याचे बोगस प्रिस्क्रिप्शन प्रियाकांने सुशांतला पाठवले होते. डॉ. कुमार याने बंदी असलेली औषधे त्या प्रिस्क्रिप्शमध्ये दिले होली. सुशांतशी कोणतीही चर्चा न करता ही औषधे देण्यात आली होती. ही औषधे टेलिमेडिसीन प्रॅक्टिस गाईडलाईन्सनुसार ऑनलाइन देता येत नाहीत. 

रियाच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करुन तो सीबीआयकडे वर्ग केला होता. या एफआयआरवर नेमकी काय कार्यवाही करावयाची हा प्रश्न सीबीआयला पडला आहे. या प्रकरणी कायदेशीर सल्ला सीबीआय घेत आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेणे सीबीआयसाठी बंधनकारक आहे. अन्यथा रिया या एफआयआरबाबत न्यायालयात गेल्यास सीबीआयच्या अडचणी आणखी वाढू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आता प्रियांकासिंह आणि मीतूसिंह या सुशांतच्या बहिणींना या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही एफआयआर रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस.शिंदे आणि एम.एस.कर्णिक यांच्यासमोर आज सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची गरज नाही असे सांगून यावरील सुनावणी 13 ऑक्टोबरला ठेवली आहे.  

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com