मोठी बातमी : सिरमची लवकरच लहान मुलांसाठी कोरोना लस

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनावरील कोव्होव्हॅक्स लशीचे उत्पादन करीत आहे.
sii will start novovax vaccine trial for children from july
sii will start novovax vaccine trial for children from july

नवी दिल्ली : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) कोरोनावरील कोव्होव्हॅक्स लशीचे (Covovax) उत्पादन करीत आहे. या लशीने परिणामकारकतेत कोव्हिशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिनला (Covaxin) मागे टाकले आहे. ही लस सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार असून, या लशीची चाचणी लहान मुलांवरही केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्होव्हॅक्स लस नोव्होव्हॅक्स या अमेरिकेतील कंपनीसोबत सिरम तयार करीत आहे. सिरमकडून नोव्होव्हॅक्सच्या लशीची मुलांसाठी जुलैपासून चाचणी सुरू होणार आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी सिरमची कोरोना लस लवकरच मिळण्याची शक्यता आहे. अमरिकेतील या लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. ही 90 टक्के प्रभावी आढळली आहे. 

कोव्होव्हॅक्स लशीच्या भारतातील पौढांसाठीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सिरमकडून ही लस सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होईल. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सिरमसोबत नोव्होव्हॅक्स कंपनीने कोव्होव्हॅक्स लशीच्या उत्पादनासाठी करार केला होता. या लशीच्या भारतातील चाचण्या नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील. भारतात लशीच्या चाचण्या पूर्ण झालेल्या नसल्या तरी जागतिक पातळीवर झालेल्या चाचण्यांच्या आधारे या लशीच्या मंजुरीसाठी अर्ज करता येतो, अशी माहिती सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावालांनी दिली. 

अमेरिकेतील या लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. याविषयी नोव्होव्हॅक्स कंपनीने म्हटले आहे की, मध्यम ती तीव्र स्वरुपाच्या कोरोना संसर्गापासून ही लस 100 टक्के संरक्षण देते. याचवेळी एकूण 90.4 टक्के संरक्षण ही लस देते. अमेरिका आणि मेक्सिकोतील 119 शहरांमध्ये या चाचण्या करण्यात आल्या. यात 29 हजार 960 जणांचा सहभाग होता. यावर्षातील तिसऱ्या आठवड्यात या लशीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येईल. 

या लशीच्या परिणामकारकता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत 90.4 टक्के आहे. अमेरिकेतील फायजर आणि मॉडर्ना यांच्या कोरोना लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांतील परिणामकारकता अनुक्रमे 91.3 टक्के आणि 90 टक्के आहे. याचवेळी कोव्हिशिल्डची परिणामकारकता 76 टक्के (अमेरिकेतील चाचण्या) आणि कोव्हॅक्सिनची परिणामकारकता 81 टक्के आहे. 

सध्या देशात प्रामुख्याने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर होत आहे. परिणाकारतेचा विचार केल्यास ही लस कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनरपेक्षा अधिक प्रभावी आहे. देशात स्पुटनिक व्ही या लशीचा काही प्रमाणात वापर सुरू आहे. स्पुटनिक व्ही लशीची परिणामकारकता 91.6 असून, जवळपास कोव्होव्हॅक्स लशीएवढीच आहे. कोव्होव्हॅक्स ही लस मध्यम ते तीव्र कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळवून देत आहेत.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com