गुजरात प्रभारी की राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री? यावर सचिन पायलट म्हणाले...

सचिन पायलट यांनी मागील वर्षी 18 आमदारांसह गेहलोत यांच्या विरोधात बंड पुकारले होते. त्यावेळी पक्षाने पायलट यांनी मांडलेले मुद्दे सोडवण्यासाठी एक समिती नेमली होती.
sachin pilot says congress leadership will take final decision
sachin pilot says congress leadership will take final decision

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वादावर अखेर तोडगा निघाला आहे. या वादात काँग्रेसच्या (Congress) हरियाणा प्रदेशाध्यक्षा कुमारी शैलजा (Kumari Sailaja) यांची मध्यस्थी यशस्वी झाली आहे. यामुळे राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडेही अखेर मार्गी लागले आहे. यावर पायलट यांनीही सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

मला गुजरातमध्ये काँग्रेस प्रभारी बनवणार की राजस्थानचा मुख्यमंत्री बनवणार याबद्दल मला बोलायचे नाही, असे पायलट यांनी स्पष्ट केले. कोण काय होणार आणि कुणाला कुठले पद मिळणार हे पक्षाचे दिल्लीतील नेतृत्व ठरवणार आहे. कोण मंत्री आणि कोण मुख्यमंत्री होणार हेसुद्धा पक्षाचे नेतृत्व ठरवेल, असेही त्यांनी नमूद केले. पायलट यांनी मागील वर्षी 18 आमदारांसह गेहलोत यांच्या विरोधात बंड पुकारले होते. त्यावेळी पक्षाने पायलट यांनी मांडलेले मुद्दे सोडवण्यासाठी एक समिती नेमली होती. अद्याप या समितीने कोणताही तोडगा काढलेला नसून, पायलट यांची पक्षाला वारंवार आठवण करून देत आहेत. 

पक्षांतर्गत मुद्दे सोडवण्यासाठी समिती नेमून एक वर्ष होऊन गेले आहे. पक्ष आणि सरकारने आता एकत्रित काम करण्याची गरज आहे. राज्यात 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवायचा असेल तर आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकायला हवीत. आधी मिळालेल्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा आपण पुढील निवडणुकीत मिळवायला हवीत, असेही पायलट यांनी स्पष्ट केले. 

हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षा कुमारी शैलजा या नुकत्याच जयपूरमध्ये आल्या होत्या. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विशेष दूत म्हणून त्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्या दिल्लीला परतल्या होत्या. दिल्लीत त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती. त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला सोनिया गांधींच्या समोर मांडला. याला सोनियांनी ग्रीन सिग्नल दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला आहे. राजस्थानध्ये मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला होती. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रस्तावावर दोन्ही नेत्यांची सहमती झाल्याचे समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com