येडियुरप्पांची राज्ययात्रा भाजप थांबवणार? पक्षाचे प्रभारी म्हणाले...

मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले येडियुरप्पा आता राज्यभरात दौरा करणार आहेत. परंतु, त्यांचा हा दौरा 'एकला चलो रे' असून, यात पक्षातील नेत्यांना स्थान असणार नाही.
yediyurappa does not require bjp permission for state tour
yediyurappa does not require bjp permission for state tour

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले येडियुरप्पा आता राज्यभरात दौरा करणार आहेत. परंतु, त्यांचा हा दौरा 'एकला चलो रे' असून, यात पक्षातील नेत्यांना स्थान असणार नाही. हा दौरा भाजप नेतृत्व  थांबवणार, अशी चर्चा सुरू झाली होती. यावर अखेर पक्षाचे प्रभारी अरूणसिंह यांनी खुलासा केला आहे.  

राज्यात 2023 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप नेतृत्वाने पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात विविध दौऱ्यांचे आयोजन केले जात आहे. जनतेचा पाठिंबा मिळवणे आणि पक्षांतर्गत मतभेद दूर करणे हे यामागील उद्देश आहेत. याचवेळी येडियुरप्पांनी वेगळ्या दौऱ्याची घोषणा केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या दौऱ्यात भाजपच्या नेत्यांना स्थान नसेल. या दौऱ्यात येडियुरप्पा हे  भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील.  

येडियुरप्पांच्या दौऱ्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येडियुरप्पांच्या दौऱ्याबद्दल बोलताना ते म्हणाले होते की, येडियुरप्पांची प्रस्तावित राज्य यात्रा भाज थांबवणार नाही. ही यात्रा गणेश चतुर्थीनंतर होणार आहे. येडियुरप्पा हे 78 वर्षांचे असून, अतिशय अनुभवी नेते आहेत. राज्यात दौरा काढण्यासाठी त्यांना पक्ष नेतृत्वाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

पक्षनेतृत्व आणि येडियुरप्पा यांचा एकच उद्देश असून, त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपची सत्ता आणायची आहे. असे असले तरी दोन्हींचे मार्ग वेगळे आहेत. यातून भाजपमधील मतभेद समोर येऊ लागले आहेत. येडियुरप्पांच्या दौऱ्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी भाजपचे सरचिटणीस व राज्य प्रभारी अरुणसिंह हे आता राज्याचा दौरा करीत आहेत. ते सध्या जुन्या म्हैसूर विभागात आहेत. ते हुबळीकडे रवाना होणार आहेत. नंतर ते दक्षिण कर्नाटकातील इतर भागांचा दौरा करणार आहेत. याचबरोबर पक्षाचे सरचिटणीस सी.टी.रवी हेसुद्धा राज्यात विविध भागांमध्ये दौरा करीत आहेत. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com