पंधरा विरोधी पक्षांचे चाळीसहून अधिक नेते एकत्र आले पण चर्चा काँग्रेस नेतृत्वाची

कपिल सिब्बल हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नाराजीचे पत्र लिहिलेल्या 23 नेत्यांपैकी एक आहेत.
Questions On Gandhis Leadership at Kapil Sibals Dinner For Opposition
Questions On Gandhis Leadership at Kapil Sibals Dinner For Opposition

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्या घरी सोमवारी (ता. 10) रात्री जवळपास पंधरा विरोधी पक्षांचे सुमारे 40 हून अधिक नेते एकत्र आले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचाही समावेश होता. सिब्बल यांच्या वाढदिवसानिमित्त या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण वाढदिवस साजरा करता करता राजकीय चर्चेला सुरूवात झाली अन् थेट काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहचली. काहींनी थेट गांधी कुटूंबातील नेतृत्वावरच आक्षेप घेतल्याचे समजते. (Questions On Gandhis Leadership at Kapil Sibals Dinner For Opposition)

कपिल सिब्बल हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नाराजीचे पत्र लिहिलेल्या 23 नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडूनही काँग्रेस नेतृत्वाबाबत नेहमी वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता वाढदिवसाच्या मेजवानीतच पक्षाच्या नेतृत्वावर विरोधी पक्षातील नेत्यांनीही चर्चा केली आहे. या कार्यक्रमात शरद पवार व संजय राऊत यांच्यासह काँग्रेसचे नेते शशी थरूर, आनंद शर्मा, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन, डीएमकेचे तिरूची सिवा, आरएलडीचे जयंत चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, अकाली दलाचे नरेश गुजराल आदी उपस्थित होते.  

सिब्बल यांनी सुरूवात करताना भाजप हल्ला चढवला. भाजपकडून संस्था संपवून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. ओमर अब्दुल्ला यांनी जेव्हा जेव्हा काँग्रेस मजबूत होते तेव्हा विरोधकही मजबूत बनतात, असा मुद्द उपस्थित केला. पक्ष बळकट करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

नरेश गुजराल यांनी थेट गांधी नावाचा उल्लेख करून शरसंधान साधले. गांधी कुटूंबाच्या हातातून बाहेर आल्याशिवाय काँग्रेस पक्ष मजबूत होणे खूप कठीण असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी यापूर्वी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी नेतृत्वात बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. अनेक नेत्यांकडून राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

लालू प्रसाद यादव यांनी 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. ते काही दिवसांपूर्वीच जामीनावर तुरूंगातून बाहेर आले आहेत. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी प्रादेशिक पातळीवर स्थानिक पक्षांनी भाजप विरोधात एक व्हायला हवे, असे सुचविले. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उपस्थितांनी अखिलेश यादव यांना शुभेच्छाही दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com