कोरोना लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना 15 सप्टेंबरपासून पाठवणार सक्तीच्या रजेवर

सरकारने कोरोना लसीकरणावरील भर वाढवला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना लसीकरणाची सक्ती करुनही ते लस घेत नसल्याचे समोर येत आहे.
punjab government will send unvaccinated employees on leave
punjab government will send unvaccinated employees on leave

चंडीगड : सरकारने कोरोना लसीकरणावरील (Covid Vaccination) भर वाढवला आहे.  सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employee) लसीकरणाची सक्ती करुनही ते लस घेत नसल्याचे समोर येत आहे. यामुळे पंजाब सरकारने लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना 15 सप्टेंबरपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याबाबत घोषणा केली आहे. कोरोना लशीचा पहिला डोस न घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना 15 सप्टेंबरपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यातील सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कोरोना निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत वाढवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्च स्तरीय बैठकही घेतली. 

याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जातील. लसीकरण टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल. याचबरोबर शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा किमान एक डोस घेतल्यानंतर 4 आठवड्यांनी त्यांना कामावर हजर होता येईल. त्यांना दर आठवड्याला आरटी-पीसीआर चाचण्यांचा अहवाल सादर करावा लागेल. इतर व्याधी असणाऱ्या शालेय कर्मचाऱ्यांना दोन्ही डोस घेतले असल्यासच कामावर हजर होता येईल.  

देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे. आधी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत होता. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरासही सरकारने परवानगी दिली आहे. 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com