ह्यांचा जन्म झाला त्यावेळी मी सीमेवर लढत होतो! मुख्यमंत्र्यांचा प्रदेशाध्यक्षांना चिमटा

पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद अखेर शमला आहे.
ह्यांचा जन्म झाला त्यावेळी मी सीमेवर लढत होतो! मुख्यमंत्र्यांचा प्रदेशाध्यक्षांना चिमटा
punjab cm amarinder singh taunts new congress state president sidhu

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्यातील वाद अखेर शमला आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार आज स्वीकारला. सिद्धू यांचा जन्म झाला त्यावेळी मी सीमेवर लढत होतो, असा चिमटा या वेळी मुख्यमंत्र्यांनी काढला.  

सिद्घू यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासोबत चार कार्याध्यक्षांनीही आज पदभार स्वीकारला. या वेळी मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती होती. जनतेकडून सिद्धू यांच्या नावाच्या सुरू असलेल्या गजरात त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतला. सिद्धू यांनी अतिशय जोरदारपणे नवी इनिंग आजपासून सुरू केली आहे. आधीचा संघर्ष मागे सोडून पुढे वाटचाल करण्याचा निर्धार त्यांनी केला. 

मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलताना सिद्धू यांनी कोपरखळी मारली. सिद्घू यांचा जन्म झाला त्यावेळी मी सीमेवर लढत होतो, असे मुख्यमंत्री म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मुख्यमंत्र्यांनी आम आदमी पक्षावरही (आप) निशाणा साधला. ते म्हणाले की, 'आप'ला आता राज्यात राजकीय बस्तान बसवायचे आहे. माझ्या 'आप'वर अजिबात विश्वास नाही. त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत, असेही बोलले जात आहे.  

दरम्यान, पंजाब भवनमध्ये आज सकाळी सिद्धू सुरवातीला दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. या वेळी माध्यमांना आतमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. केवळ मंत्री, आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांनाच प्रवेश दिला गेला होता.  सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्रित चहा घेतला. या वेळी पंजाबचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि सिद्धू एकमेकांशेजारी बसले होते. या वेळी दोघांनी एकमेकांशी हास्यविनोदही केले. या चहापानाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी, प्रतापसिंग बाजवा आणि लालसिंग हे सुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि सिद्धू यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर चार महिन्यांनी दोघे एकमेकांना आज भेटले. 

प्रदेशाध्यक्षपदाच्या पदग्रहण कार्यक्रमाचे निमंत्रण सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्यात म्हटले होते की, माझी नियुक्ती ही सोनिया गांधी यांनी केली आहे. माझी तुमच्या विरोधात भूमिका नाही. लोकांच्या बाजूची माझी भूमिका आहे. तुम्ही पंजाब काँग्रेसमधील ज्येष्ठ आहात. त्यामुळे तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाला येऊन काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीली आशीर्वाद द्यावेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in