नवीन इनिंग सुरू होताच सिद्धू म्हणाले, ज्यादा नही बोलना सी, पर विस्फोटक बोलना सी!

सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार आज स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आक्रमक शैलीत जोरदार फटकेबाजी करीत आता आपणच कॅप्टन असल्याचे दाखवून दिले.
navjot singh sidhu takes charge of punjab congress president
navjot singh sidhu takes charge of punjab congress president

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्यातील वाद अखेर शमला आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार आज स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आक्रमक शैलीत जोरदार फटकेबाजी करीत आता आपणच कॅप्टन असल्याचे दाखवून दिले. 

सिद्घू यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्यासोबत चार कार्याध्यक्षांनीही आज पदभार स्वीकारला. या वेळी मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती होती. जनतेकडून सिद्धू यांच्या नावाच्या सुरू असलेल्या गजरात त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतला. सिद्धू यांनी अतिशय जोरदारपणे नवी इनिंग आजपासून सुरू केली आहे. आधीचा संघर्ष मागे सोडून पुढे वाटचाल करण्याचा निर्धार त्यांनी केला. 

ज्यादा नही बोलना सी पर विस्फोटक बोलना सी (आपल्याला जास्त नाही बोलायचे पण स्फोटक बोलायचे आहे), असे सांगून सिद्धू म्हणाले की, मी सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन. मला कोणताही गर्व नाही. काँग्रेस ही एकजूट असून, विरोधक म्हणत आहेत तसा कोणताही प्रकार नाही. मला विरोध करणारेच माझ्यात सुधारणा घडवून आणत आहेत. माझा लढा हा मुद्दा नाही. दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत, डॉक्टर आणि परिचारिकांच्या समस्या हे खरे मुद्दे आहेत. आपण सर्वांनी भांडणे मिटवून देवासमोर खरेपणाने उभे राहायला हवे. 

दरम्यान, पंजाब भवनमध्ये आज सकाळी सिद्धू सुरवातीला दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. या वेळी माध्यमांना आतमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. केवळ मंत्री, आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांनाच प्रवेश दिला गेला होता.  सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्रित चहा घेतला. या वेळी पंजाबचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि सिद्धू एकमेकांशेजारी बसले होते. या वेळी दोघांनी एकमेकांशी हास्यविनोदही केले. या चहापानाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी, प्रतापसिंग बाजवा आणि लालसिंग हे सुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि सिद्धू यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर चार महिन्यांनी दोघे एकमेकांना आज भेटले. 

प्रदेशाध्यक्षपदाच्या पदग्रहण कार्यक्रमाचे निमंत्रण सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्यात म्हटले होते की, माझी नियुक्ती ही सोनिया गांधी यांनी केली आहे. माझी तुमच्या विरोधात भूमिका नाही. लोकांच्या बाजूची माझी भूमिका आहे. तुम्ही पंजाब काँग्रेसमधील ज्येष्ठ आहात. त्यामुळे तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाला येऊन काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीली आशीर्वाद द्यावेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com