स्मृती इराणींवरील फेसबुक पोस्ट महागात; प्राध्यापक खातोय तुरूंगाची हवा - Professor Jailed For Obscene Facebook Post About Smriti Irani-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

स्मृती इराणींवरील फेसबुक पोस्ट महागात; प्राध्यापक खातोय तुरूंगाची हवा

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जुलै 2021

शहरयार अली असे या प्राध्यापकाचे नाव असून ते फिरोजाबादमध्ये एसआरके महाविद्यालयात इतिहास विभागाचे प्रमुख आहेत.

लखनऊ : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल फेसबुकवर लिहिणाऱ्या प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या प्राध्यापकाला पोलिस कोठडी सुनावली आहे. इराणी यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट लिहिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मागील काही दिवसांपासून हे प्राध्यापक फरार होते. (Professor Jailed For Obscene Facebook Post About Smriti Irani)

शहरयार अली असे या प्राध्यापकाचे नाव असून ते फिरोजाबादमध्ये एसआरके महाविद्यालयात इतिहास विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये इराणी यांच्याविषयी अश्लील टिप्पणी केली होती. त्यानंतर अली यांच्यासह हूमा नकवी यांच्याविरोधात रामगढ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नकवी या महिलेने ही पोस्ट शेअर केली होती. 

हेही वाचा : आता देशातील प्रत्येक राज्यात 'खेला होबे'; ममतांची गर्जना

अली यांना पोलिसांनी चौकशीसाठी अनेकदा बोलावले. पण ते घरातून फरार झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते महाविद्यालयातही जात नव्हते. पोलिसांनी अनेक ठिकाणी तपास केला पण ते हाती लागले नाहीत. या काळात पोलिसांनी स्थानिक न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. तर शहरयार यांनी अलाहाबाद न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. 

उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले. पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. अखेर ते मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण गेले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली. शहरयार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर महाविद्यालयानेही त्यांच्यावर कारवाई केली आहे. 

प्राचार्य प्रभास्कर राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरयार अली यांच्यावर महाविद्यालय प्रशासनाने कारवाई केली आहे. एका शिक्षकाने कोणत्याही महिलेविषयी अशाप्रकारे वादग्रस्त टिप्पणी करणे योग्य नाही, असं ते म्हणाले. शहरयार यांच्यावर कलम 505 (2) व 67 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आयटी अॅक्टमधील कलम 66 अ सहा वर्षांपूर्वीच रद्द केले आहे. त्यानंतरही या कलमांतर्गत गुन्हे दाखल होत असल्याबद्दल न्यायालयाने नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख