आता देशातील प्रत्येक राज्यात 'खेला होबे'; ममतांची गर्जना - Khela will happen in all states until BJP is removed says Mamata Banerjee-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

आता देशातील प्रत्येक राज्यात 'खेला होबे'; ममतांची गर्जना

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जुलै 2021

भाजपवर टीका करताना ममतांनी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी देशपातळीवर भाजपच्या विरोधात मोर्चा उघडला. बंगाल निवडणुकीवेळी प्रसिध्द झालेली 'खेला होबे' ही घोषणा देत त्यांनी भाजपला देशातून हद्दपार करण्याचा निश्चय केला. भाजपची सत्ता देशातील प्रत्येक राज्यातून जाईपर्यंत आता 'खेला' सुरू राहील, असं त्यांनी जाहीर केलं. येत्या 16 ऑगस्ट रोजी देशभरात खेला दिवस साजरा केला जाईल, अशीही घोषणा करण्यात आली. (Khela will happen in all states until BJP is removed says Mamata Banerjee) 

शहीद दिनानिमित्त ममतांनी बुधवारी व्हर्चूअल माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद झाला. त्यासाठी बंगालसह गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, तमिलनाडू, त्रिपुरा यांसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. या माध्यमातून त्यांनी देशाच्या राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ही तयारी असल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा : काँग्रेस आमदारांनीच मुख्यमंत्र्यांविरोधात ठोकला शड्डू

यावेळी भाजपवर टीका करताना ममतांनी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, भाजपने देशाला अंधारात ढकलले आहे. पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून भाजप देशातील लोकशाहीला धोका निर्माण करत आहे. आमचे फोन टॅप केले जात आहेत. तुम्ही पाळत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत आहात. पण गरीबांना देत नाही. भाजपने संघराज्याची रचना उध्वस्त केली आहे. भाजपलाही या सत्तेतून घालवायला हवे, अन्यथा देशही उध्वस्त होईल, असे ममता म्हणाल्या. 

माध्यमे, न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग या तीन गोष्टींनी लोकशाही बनते. पण या तीनही बाबींना पेगॅससचा विळखा पडला आहे. मंत्री, न्यायाधीशांचे फोन टॅप होत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या मदतीसाठी पुढे यायला हवी. देशाला, लोकशाहीला वाचवा. चौकशीसाठी स्वतंत्र पॅनेलची नियुक्ती करा. केवळ न्यायव्यवस्थाच यातून देशाला वाचवू शकते, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलं.

मोदींवर टीका करताना त्या म्हणाल्या, मोदीजी तुम्ही मनावर घेऊ नका. मी तुमच्यावर वैयक्तिक टीका करत नाही. पण तुम्ही आणि कदाचित गृह मंत्री विरोधी नेत्यांच्या मागे एजन्सी लावत आहात. तुम्हा या यंत्रणांचा गैरवापर करत आहात. देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. यातून मिळणाऱ्या करातून केंद्र सरकारने 3.7 लाख कोटी रुपये मिळवले आहेत. हा पैसा गेला कुठे, असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख