ममतांचा पराभव होणारच! प्रियांका टिबरेवाल यांनी सांगितलं कारण... 

भाजपकडून शुक्रवारी बंगालमधील तीन उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार प्रियांका टिबरेवाल यांना ममतांच्या विरोधात उतरवण्यात आलं आहे.
Priyanka Tiberewal slams CM Mamata Banerjee over violence
Priyanka Tiberewal slams CM Mamata Banerjee over violence

कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या भवानीपूर (Bhawanipur) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ममतांच्या विरोधात भाजपकडून (BJP) प्रियांका टिबरेवाल (Priyanka Tibrewal) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर टिबरेवाल यांनी भवानीपूरमध्येही ममतांचा पराभव होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. (Priyanka Tiberewal slams CM Mamata Banerjee over violence)

भाजपकडून शुक्रवारी बंगालमधील तीन उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार प्रियांका टिबरेवाल यांना ममतांच्या विरोधात उतरवण्यात आलं आहे. विश्वजित सरकार, मेघालय व त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय आणि भवानीपूरमधून आधी निवडणूक लढलेले रूद्रनील घोष यांचीही नावे उमेदवारीच्या शर्यतीत होती. यामध्ये तिबरेवाल यांनी बाजी मारली आहे. 

यानंतर बोलताना टिबरेवाल म्हणाल्या, 'ममता बॅनर्जी या नंदीग्राममध्ये हरल्या आहेत. आता मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी त्या ही निवडणूक लढवत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. महिलांवर अत्याचार झाला असून अनेकांचा छळ करण्यात आला. मतदारसंघातील लोकांमध्ये जाऊन त्यांना याची माहिती दिली जाईल. त्यामुळं मला खात्री आहे, मतदार मला मतं देऊन ममतांचा पराभव करतील,' असा विश्वास टिबरेवाल यांनी व्यक्त केला. 

निवडणूक जिंकण्यासाठी कुणी मातब्बर व्यक्तीची गरज नाही. माझा लढा वैयक्तिक नाही तर अन्यायाविरोधात आहे. बंगालमधील लोकांना वाचवण्यासाठीची ही लढाई आहे. राज्यात झालेल्या हिंसाचारानंतर शांत राहिलेल्या एका व्यक्तीविरोधात (ममता बॅनर्जी) ही लढाई, असल्याचंही टिबरेवाल यांनी सांगितलं. टिबरेवाल यांच्या या वक्तव्यामुळं निवडणुकीत ममतांना पराभूत करण्यासाठी प्रामुख्याने हिंसाचाराच मुद्दा भाजपकडून उपस्थित केला जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

कोण आहेत प्रियांका टिबरेवाल? 

वकील असलेल्या प्रियांका टिबरेवाल या भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षा आहेत. त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत एंटली मतदारसंघात भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांचा त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. याचबरोबर कोलकता महापालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत टिबरेवाल या तृणमूलच्या स्वपन सम्मादार यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. नंतर 2020 मध्ये त्यांची भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बनवण्यात आले होते. 

भाजपला ममतांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा होता परंतु, अनेक नेत्यांना यास नकार दिला. डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीने बडे भाजप नेते ममतांच्या विरोधात मैदानात उतरण्यास तयार नाहीत. राज्यात तृणमूलच्या विजयानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी कोलकता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये टिबरेवाल यांचा समावेश आहे. याच याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com