काँग्रेसनं रणशिंग फुंकलं; प्रियांका गांधी काढणार 12 हजार किलोमीटरची यात्रा

आता निवडणुकीच्या तोंडावर त्या संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहेत.
Congress to take out yatra across Uttar Pradesh assembly polls
Congress to take out yatra across Uttar Pradesh assembly polls

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपसह काँग्रेसनंही जोरदार तयारी केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश हे महत्वाचं राज्य आहे. या राज्यावर भाजपसह काँग्रेसनंही जोर दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) मैदानात उतरल्या आहेत. (Congress to take out yatra across Uttar Pradesh amid assembly polls)

उत्तर प्रदेशात 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांना ऐनवेळी उतरवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचा करिष्मा फारसा चालला नाही. उलट मोदी लाटेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या संख्या सातपर्यंत खाली आहे. 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी मात्र प्रियांका यांनी कंबर कसली आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांनी उत्तर प्रदेशातील दौरे वाढले आहेत. 

आता निवडणुकीच्या तोंडावर त्या संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहेत. राज्यातील अनेक शहरे व गांवामध्ये पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. या यात्रेला 'काँग्रेस प्रतिज्ञा यात्रा : हम वचन निभाएंगे' असं नाव देण्यात आलं आहे. याबाबत शुक्रवारी उत्तर प्रदेशात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या यात्रेत त्या स्वत: पूर्णवेळ सहभागी होणार आहेत किंवा नाही, याबाबत स्पष्टता नाही. अद्याप या यात्रेचे नियोजन पूर्ण झालेले नाही. 

यात्रेदरम्यान काँग्रेस नेत्यांकडून उत्तर प्रदेशातील लोकांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याचे वचन दिले जाणार आहे. प्रियांका यांच्याकडून यात्रेदरम्यान ठिकठिकाणी कोणते मुद्दे मांडायचे, याबाबत माहिती घेतली जात आहे. या राज्यात काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन आणण्याची जबाबदारी प्रियांका यांच्यावर टाकण्यात आली आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडे सध्या 403 पैकी 312 जागा आहेत. सध्यातरी भाजपचा वरचष्मा दिसत असला तरी शेतकरी आंदोलन, कोरोना काळात राज्य सरकारला आलेले अपयश, बेरोजगारी असे अनेक मुद्दे भाजप सरकारच्या विरोधात आहेत.  काँग्रेसकडून निवडणुकीदरम्यान हे मुद्दे उपस्थित केले जाणार आहे. यात्रेदरम्यान या मुद्यांवर स्थानिक प्रश्नांवरही भर दिला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com