दोन वर्षांतच पंतप्रधान मोदींच्या तीन सल्लागारांची वेळेआधीच एक्झिट!

अमरजित सिन्हा यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे.
PMO Advisor Amarjit Sinha resigned from his post
PMO Advisor Amarjit Sinha resigned from his post

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार अमरजित सिन्हा यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे. 2019 मध्ये मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर दोन वर्षांतच तीन सल्लागारांनी वेळेआधीच एक्झिट घेतली आहे. सिन्हा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अद्याप सात महिन्यांचा कालावाधी शिल्लक आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (PMO Advisor Amarjit Sinha resigned from his post)

सिन्हा बिहारमधील असून 1983च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांची फेब्रुवारी 2020 मध्ये पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. सामाजिक क्षेत्राशी संबंधित विषयांबाबतची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. त्यापूर्वी ते ग्रामीण विकास विभागात सचिव होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असून 31 जुलै हा त्यांचा शेवटचा दिवस होता, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिन्हा यांच्या राजीनाम्याबाबतचे अधिकृत कारण समजू शकलेले नाही. पण पंतप्रधान कार्यालयातील कालावधी पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिलेले सिन्हा हे मागील दोन वर्षांतील तिसरे सल्लागार ठरले आहेत. सिन्हा यांच्याआधी पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजीनामा दिला होता. त्यांच्याजागी अतिरिक्त प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

त्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात प्रधान सल्लागार आणि माजी कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांनी पंतप्रधान कार्यालयातून राजीनामा दिला आहे. पंतप्रधान कार्यालयात सिन्हा यांची विशेषाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये प्रधान सल्लागाराचे पद निर्माण करून तिथे सिन्हा यांना बढती देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयात येण्यापूर्वी ते उर्जा मंत्रालयात सचिव पदावर होते. 

सिन्हा हे 1977 च्या तुकडीचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांचे उत्तर प्रदेश केडर असून त्यांनी युपीए व एनडीए सरकारच्या काळात अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. 2015 नंतर त्यांना तीनवेळा एकूण चार वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे सिन्हा यांचा राजीनामा मोदी सरकारसाठी धक्का मानला जात होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com