भाजप नेत्याचा यू-टर्न..आधी संन्यासाची घोषणा नंतर खासदारकी सोडण्यास नकार!

भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते. परंतु, त्यांनी आता यू-टर्न घेतला आहे.
bjp leader babul supriyo says he will remain member parliament
bjp leader babul supriyo says he will remain member parliament

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार करताना 12 मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये पश्चिम बंगालमधील भाजप खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांचाही समावेश होता. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते. खासदारकीचाही राजीनामा देण्याचेही त्यांनी म्हटले होते. परंतु, आता त्यांनी कोलांटउडी मारली आहे.  

सुप्रियो यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी यू-टर्न घेतला आहे. त्यांनी आता म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये मी घटनात्मक जबाबदारी (खासदार) पार पाडत राहीन. घटनात्मक पदाच्या पलिकडे राजकारण असते. मी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. मी दिल्लीतील खासदार निवासस्थान रिकामे करणार आहे. माझ्या सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनीही मी लवकरच जबाबदारीतून मुक्त करेन. 

मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर सुप्रियो हे राजकारणातून संन्यास घेणार, अशी चर्चा सुरू होती. सुप्रियो यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजकारण संन्यासाची घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते की, गुडबाय, मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यापैकी कुणीही मला बोलावलेले नाही तसेच, मीसुद्धा तेथे जणार नाही. सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारणात राहण्याची आवश्यकता नाही. मी खासदारकीचा राजीनामा देणार आहे. 

काही दिवसांपूर्वी सुप्रियो हे तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यांनी ट्विटरवर तृणमूल काँग्रेस आणि मुकुल रॉय यांनी फॉलो करण्यास सुरवात केली होती. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या मुकुल रॉय यांची नुकतीच तृणमूलमध्ये घरवापसी झाली आहे. सुप्रियो हे त्यांना फॉलो करु लागल्यामुळे त्यांच्या तृणमूल प्रवेशाचा अंदाज वर्तवला जात होता. यामुळे राज्यातील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. 

सुप्रियो यांच्याकडे पर्यावरण राज्यमंत्रिपद होते. मंत्रिमंडळ विस्ताराआधी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. याबाबतची माहिती त्यांनी फेसबुकवरून दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले होते. आपल्याला राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आले होते, त्यानुसार मी राजीनामा दिला आहे, अशी माहिती त्यांनी सुरूवातीला पोसटमध्ये दिली होती. पण नंतर त्यांनी काही तासांतच बदल केला होता. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी ही चूक सुधारत आपल्याला राजीनामा मागितला नाही, आपणच दिल्याचे म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com