मोठी बातमी : पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची आशा मावळली

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.
petrol and diesel proposal not put up in gst council meet
petrol and diesel proposal not put up in gst council meet

नवी दिल्ली : देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल वस्तू व सेवा करांतर्गत  (जीएसटी) आणण्याचा प्रस्ताव जीएसटी परिषदेत आज मांडला जाईल, अशी मोठी चर्चा सुरू होती. परंतु, बैठकीत हा प्रस्तावच मांडण्यात आला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

लखनौ येथे जीएसटी परिषदेची 45 वी बैठक आज झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत पेट्रोल व डिझेल जीएसटीअंतर्गत आणण्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. देशात बहुतेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे. यातच एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. या दरवाढीमुळे आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेला आणखी चटके बसू लागले आहेत. त्यामुळं दरवाढ कमी करण्याची मागणी जोर धरत आहे. पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागू केल्यास हे दर खूप खाली येऊ शकतात. 

आजच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलबाबत प्रस्ताव मांडण्यात आला नाही. याऐवजी बायोडिझेलवरील जीएसटी कमी करुन 5 टक्क्यांवर आणण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, धातूंवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याचाही निर्णय झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल व डिझेलवर जीएसटी लागू केल्यास देशभर फक्त 28 टक्के कर लागू होईल. म्हणजेच केंद्र सरकार आणि विविध राज्यांमध्ये असलेले सर्वप्रकारचे कर रद्द होऊन केवळ जीएसटी असेल. असे झाल्यास इंधनाचे दर 30 ते 40 टक्कयांनी खाली येऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल. त्यामुळे जीएसटी परिषदेच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. 

सध्या दिल्लीत पेट्रोलचा मूळ दर प्रतिलिटर 40.78 रुपये आहे. यात वाहतूक खर्च दर धरून वितरकाला हा दर 41.10 रुपये पडतो. यावर उत्पादन शुल्क 32.90 रुपये, वितरकाचे कमिशन 3.84 रुपये, मूल्यवर्धित कर (व्हॅट) 23.35 रुपये आकारले जाते. यानंतर ग्राहकाला दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपयांना विकले जाते. आता जीएसटी लागू झाल्यास केवळ 28 टक्के कर असेल म्हणजेच तो 11.50 रुपये असेल. त्यावर वितरकाचे कमिशन 3.84 रुपये धरून ग्राहकाला पेट्रोल 56.44 रुपयांना मिळू शकते. 

हाच प्रकार डिझेलच्या बाबतीत आहे. दिल्लीत डिझेलचा मूळ दर प्रतिलिटर 41.27 रूपये आहे. ग्राहकाला डिझेलची विक्री 88.62 रूपयांना केली जात आहे. जीएसटी लागू झाल्यास हा दर 55.41 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. परंतु, सरकार एवढा कर सोडून देणार की जीएसटीवरील सर्वाधिक कराची 28 टक्क्यांचा स्लॅब पेट्रोल आणि डिझेलसाठी वाढवणार हा प्रश्न होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com