Pakistan Imran Khan News : मोदींपेक्षा इ्म्रान खान अधिक धोकादायक ; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले, "त्यांना जन्मठेप.."

Imran khan biggest security threat for pakistan : जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे पाकिस्तानातील राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Former PM Imran khan
Former PM Imran khanSarkarnama

Imran khan biggest security threat for pakistan than indian pm modi: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या एकटे पडले आहेत. अशातच पाकिस्तानी लष्कर बिलावर भु्ट्टो यांना पंतप्रधान बनविण्याच्या तयारीत आहे.

इम्रान खान यांच्या विरोधात पाकिस्तानी लष्कर न्यायालयात खटला चालविणार आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे पाकिस्तानातील राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Former PM Imran khan
Ashok Gehlot Announce Free Electricity : 'मोफत वीज' ठरली सत्तेच्या सोपानाचं ‘जुगाड’ ; दिल्ली, पंजाबनंतर आता 'या' राज्यातही..

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ होत असताना सरंक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ख्वाजा आसिफ म्हणाले, "पाकिस्तानसाठी इम्रान खान हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा अधिक धोकादायक आहेत,"

जियो न्यूजचे वरिष्ठ पत्रकार हामिद मीर यांच्याशी बोलताना संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी हे विधान केलं आहे. हामिद मीर यांनी या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप टि्वटवर शेअर केली आहे. यात ते म्हणतात, "आश्चर्यकारक, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी इम्रान खान हे पाकिस्तानच्या सुरक्षेबाबत नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही धोकादायक आहेत,"

Former PM Imran khan
NCP : परवानगी घेऊनच ते शिंदे गटात गेले ; जयंतरावांनी सांगितला एका कार्यकर्त्याचा तो किस्सा..

"तुम्हाला बाहेरचे शत्रु दिसतात, पण देशातील शत्रूंकडे लक्ष जात नाही. त्यांच्या कारवाया दिसत नाही. अशा देशातील शत्रुंपासूनचा धोका अधिक आहे. बाहेरील शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रू अधिक धोकादायक आहेत," असे ख्वाजा आसिफ यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

Former PM Imran khan
Vaidyanath sugar Factory Election : मुंडे बहिण-भाऊ यांच्यात सेटलमेंट ;वैद्यनाथ कारखाना निवडणूक बिनविरोध

शहबाज शरीफ सरकारने नऊ मे रोजी झालेल्या दंगलीला इम्रान खान आणि त्यांच्या समर्थकांना जबाबदार धरले आहेत. त्यांच्याविरोधात खटला चालविण्याचा आदेश लष्कराने दिला आहे. इम्रान खान यांच्या एक हजार समर्थकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इम्रान खान यांचे कोर्ट मार्शल होणार असल्याची माहिती आहे. ते दोषी आढळल्यास त्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. "राक्षसी प्रवृत्तीचे व्यक्ती" असा शब्दात शहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com