कोण मित्र अन् कोण शत्रू हे आम्हाला कळलंच नाही; नितीशकुमारांचा कबुलीजबाब

बिहारमध्ये सत्ताधारी भाजप आणि जेडीयूमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. आता मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Nitish Kumar says JDU paid price for delay in seat sharing within NDA
Nitish Kumar says JDU paid price for delay in seat sharing within NDA

पाटणा : बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सरकार सत्तेवर आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी असूनही, नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी आहेत. मागील काळात दोन्ही पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. आता नितीशकुमार यांनी भाजपवर निशाणा साधला असून, कोण मित्र अन् कोण शत्रू हे ओळखू शकलो नसल्याचे म्हटले आहे. 

जेडीयूच्या बैठकीत बोलताना नितीशकुमार यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) जागावाटपाला अतिशय विलंब लागला. विधानसभा निवडणुकीआधी किमान पाच महिने जागावाटप व्हायला हवे होते. याची मोठी किंमत आम्हाला मोजावी लागली. मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची माझी तयारी नव्हती. परंतु, भाजप आणि आमच्या पक्षाकडून आलेल्या दबावामुळे मी हे पद स्वीकारले. 

आम्ही जेथे मागितली तेथे जनतेने आम्हाला मते दिली. जनतेच्या मनात याविषयी गोंधळ नव्हता. खरा गोंधळ आमच्याच बाजूने होता. मी आणि माझ्या पक्षाविरोधात खोटा प्रचार करण्यात आला. कोण मित्र आणि कोण शत्रू हे आम्हाला वेळीच ओळखता आले नाही. कोणावर विश्वास ठेवायचा हे सुद्धा आम्हाला कळाले नाही. आम्हाला हे कळाले त्यावेळी खूप उशीर झाला होता, असेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह 15 मंत्र्यांनी 16 नोव्हेंबरला शपथ घेतली होती. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र, याला भाजपकडून विलंब लावला जात आहे. विस्तारासाठी भाजपकडून नावे दिली जात नसल्याचे खुद्द नितीशकुमारांनी उघड केले आहे. यामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद दूर झाले नसल्याचे समोर आले आहे. 

नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कधीही मंत्रिमंडळ विस्ताराला एवढा कालावधी लागलेला नव्हता. नितीशकुमारांनीच याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, याआधी कधीही मला मंत्रिमंडळ विस्तारास एवढा वेळ लागला नव्हता. आम्ही सुरवातीलाच मंत्रिमंडळ विस्तार करीत होतो. 

नियमानुसार बिहारमध्ये 36 मंत्री होऊ शकतात. सध्या केवळ 14 मंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांसह 15 मंत्र्यांनी 16 नोव्हेंबरला शपथ घेतनंतर लवकरच विस्तार होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर बोलताना भाजपचे प्रदेश प्रवक्ते म्हणाले की, आम्ही लवकरच या मुद्द्यावर पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चिंता व्यक्त केली असून, त्यांचे समाधान केले जाईल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com