सुशांतला ड्रग्जची सवय लावणारा गायब मित्र अखेर सापडला!

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे गूढ साडेसात महिन्यानंतरही कायम आहे. आता सुशांतला अमली पदार्थांची सवय लावणाऱ्या मित्राला अटक झाली आहे.
ncb arrested sushant singh rajput friend rishikesh pawar
ncb arrested sushant singh rajput friend rishikesh pawar

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. दोघेही सध्या जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, सुशांतला अमली पदार्थांची सवय लावणाऱ्या गायब मित्राला अखेर एनसीबीने अटक केली आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली होती. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला होता. या प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्यासह काही जणांची एनसीबीने चौकशी केली होती. 

सुशांतचा मित्र असलेला सहाय्यक दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, तो गायब झाला होता. एनसीबीची पथके त्याचा शोध घेत होती. चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर पवार हा गायब झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. एनसीबीच्या पथकांनी मुंबईत काही ठिकाणी छापे टाकून ऋषिकेशचा शोध घेतला होता. अखेर त्याला काल अटक करण्यात आली. त्याची रवानगी न्यायालयाने दोन दिवसांच्या एनसीबी कोठडीत केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा गांजा आणि हशीशचा अनेक वेळा पुरवठा करीत होता. ऋषिकेशचा लॅपटॉप जप्त केला असून, याचे फोटोही त्यात सापडले आहेत. सुशांतने नंतर त्याला कामावरुनही काढून टाकले होते. सुशांत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या अमली पदार्थांच्या अँगलमध्ये अटक करण्यात आरोपींची संख्या आता 30 वर पोचली आहे. 

रियाला एनसीबीने 6 सप्टेंबरला अटक केली होती. शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांना एनसीबीने 4 सप्टेंबरला अटक केली होती. न्यायालयाने रियाची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. ती भायखळा कारागृहात तर, शौविक हा तळोजा कारागृहात होता. रिया आणि शौविक यांच्या वतीने त्यांचे वकील सतिश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते.

उच्च न्यायालयाने 10 ऑक्टोबरला रियाला जामीन मंजूर केला होता मात्र, शौविकचा जामीन फेटाळला होता. रियाला अटक झाल्यानंतर महिनाभराने तिची सुटका झाली होती. अखेर शौविक याला विशेष न्यायालयाने 2 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. सुमारे तीन महिन्यानंतर शौविकला जामीन मिळाला होता. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. नंतर सर्वोच्च  न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com