ममतादीदींच्या विरोधात लढण्यास मिथुनदांचा नकार..भाजपला मिळेना उमेदवार!

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जीया भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांना ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे.
mithun chakraborty will not contest against mamata banerjee
mithun chakraborty will not contest against mamata banerjee

कोलकता : केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील (West Bengal) तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या भवानीपूर (Bhawanipur) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांना ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे. भाजप (BJP) ममतांच्या विरोधात कुणाला उमेदवारी देणार याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरला सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममध्ये जाण्याचा निर्णय चांगलाच भोवला होता. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले खरे पण त्यांना तेथे पराभव पत्करावा लागला. आता त्यांना पुन्हा निवडणूक लढवून विजयी होत मुख्यमंत्रिपद टिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूरला पसंती दिली आहे. पण भाजपनंही ममतांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून ममतांच्या विरोधात बडा नेता उतरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पक्षाने गळ घातली होती. परंतु. मिथुन यांनी याला स्पष्टपणे नकार दिला आहे. भाजपला ममतांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा आहे. परंतु, अनेक नेत्यांना यास नकार दिला. डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीने बडे भाजप नेते ममतांच्या विरोधात मैदानात उतरण्यास तयार नाहीत. त्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढू लागली आहे. राज्य भाजपने सहा जणांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने बंगालमधील तीन तर ओडिशामधील एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बंगालमधील भवानीपूरसह समशेरगंज आणि जांगीरपूर तर ओडिशातील पिपली मतदारसंघात 30 सप्टेंबरला मतदान होईल. निवडणुकीचा निकाल 3 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. इच्छुकांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्यानं ममता बॅनर्जी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून सहा महिन्यांच्या आत त्यांना निवडणूक लढवून विजयी होणं आवश्यक आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून अद्याप तारखा जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे तृणमूल काँग्रेसकडून सातत्याने याबाबत पाठपुरावा सुरू होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com