नरेंद्र मोदींसोबत या होत्या फ्लॅग ऑफिसर.. ..

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी वादविवाद, वक्तृत्व स्पर्धत अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. त्यांना आतापर्यंत ७५ मेडल आणि २५० सन्मानपत्र देऊन गैारविण्यात आले आहेत.
पांडे.jpeg
पांडे.jpeg

नवी दिल्ली :  स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधानासोबत झेंडावंदन करताना फ्लॅग ऑफिसर उपस्थित असतात. यंदा ही संधी मेजर श्वेता पांडे यांनी मिळाली. मेजर श्वेता पांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिंरगा फडकविण्यात मदत केली. जाणून घेऊयात कोण आहेत या श्वेता पांडे. 

श्वेता पांडे या लष्करातील ५०५ बेस वर्कॅशॅाप येथे  (इलेक्ट्रॉनिक आणि मैकेनिकल इंजीनियर) अधिकारी आहेत.  या वर्षी जूनमध्ये मास्को येथील विजय दिवसाच्या संचालनात सहभागी झाल्या होत्या. मेजर पांडे या मुळच्या लखनैा येथील आहेत.  मार्च २०१२ येथे चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील राज रतन पांडे हे उत्तरप्रदेश सरकारच्या वित्त विभागात अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत होते. तर आई अमिता पांडे या संस्कृत, हिंदी या विषयाच्या प्राध्यापिका आहेत.  

श्वेता यांचे प्राथमिक शिक्षण लखनैा येथील सिटी मॅान्टेसरी स्कूलमध्ये झाले आहे.  शिक्षणाच्या बाबतीत जगात प्रसिद्ध असलेले हे स्कूल आहे.  संगणक शास्त्रात प्रथम श्रेणीत त्यांनी बी.टेक. ही पदवी प्राप्त केली आहे. महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी वादविवाद, वक्तृत्व स्पर्धत अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. त्यांना आतापर्यंत ७५ मेडल आणि २५० सन्मानपत्र देऊन गैारविण्यात आले आहेत.  चेन्नई येथील लष्करी प्रशिक्षणात त्यांनी  गढ़वाल राइफल्स मेडल पटकाविले आहे. 
Edited by : Mangesh Mahale 

नवी दिल्ली :  "आजपासून राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशनला सुरवात करण्यात येणार आहे.  देशातील प्रत्येकाला हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. या माध्यमातून त्या व्यक्तीच्या  आरोग्याची माहिती त्यात असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. "आपण किती दिवस कच्च्या माल आयात करत राहणार, आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल,"  असेही मोदी यांनी आज सांगितलं. आज 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.  मोदी यांनी  सातव्यांदा लाल किल्ल्यावरून झेंडावंदन केले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com