नरेंद्र मोदींची ही मोठी घोषणा.. आजपासून सुरवात

पायाभूत सुविधांसाठी ७ हजार प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ११० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे
4PM_20MOdi.jpeg
4PM_20MOdi.jpeg

नवी दिल्ली :  "आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनला सुरवात करण्यात येणार आहे.  देशातील प्रत्येकाला हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. या माध्यमातून त्या व्यक्तीच्या आरोग्याची माहिती त्यात असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. "आपण किती दिवस कच्च्या माल आयात करत राहणार, आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल," असेही मोदी यांनी आज सांगितलं. आज 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून  नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. मोदी यांनी  सातव्यांदा लाल किल्ल्यावरून झेंडावंदन केले.  

मोदी म्हणाले, " आज नवीन संकल्प करण्याचा दिवस आहे. कोरोना काळात संकल्प करणं आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत हा देशासाठी मंत्र आहे.  आत्मनिर्भर बनणं सध्या आवश्यक आहे. देशातील जनता जो संकल्प करते तो जिद्दीने पूर्ण करते. माझा या देशातील तरूण आणि महिलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. कृषी क्षेत्रात भारत आत्मनिर्भर झाला आहे, देशाला अधिक आत्मनिर्भर करण्यासाठी व्होकल आॅफ लोकलसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत देशाचं मोठ योगदान आहे."

पायाभूत सुविधांसाठी ७ हजार प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ११० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. मुलींच्या लग्नाबाबत काय वय असावे, यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे, असे मोदी यांनी सांगितले.   


यंदा शालेय विद्यार्थ्यांऐवजी राष्ट्रीय कॅडेट कोरच्या (एनसीसी) निवडक मुलांनाच प्रवेश दिला होता. व त्यांचीही बसण्याची व्यवस्था जनपथ रस्त्यावरच्या लाल किल्ल्याजवळील भागात करण्यात आली होती.  आजच्या सोहळ्यात लहान मुले कोरोनामुळे दिसत नाही, याबाबत मोदींनी खंत व्यक्त केली.  यंदाच्या सोहळ्यासाठी कोरोना योद्ध्यांसह चार हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाच्या सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग व मास्कसह सर्व उपाययोजनांचे काटेकोर पालन करणे उपस्थितांना बंधनकारक होते. मुख्य कार्यक्रमात आमंत्रितांना रांगा लावण्याचा त्रास होऊ नये यासाठी लाल किल्ल्याच्या चारही बाजूंनी अतिरिक्त प्रवेश व्दार बसविण्यात आली आहेत. सर्व ठिकाणी येणाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत होते.  मास्क व हँड सॅनिटायजरही परिसरात ठिकठिकाणी ठेवण्यात आले होते.   

पंतप्रधान म्हणून सलग सातव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणारे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान, असा विक्रम करणारे नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याच्या आगमनाआधी दीड तास लाल किल्ला परिसरात संपूर्ण प्रवेशबंदी होती.   यंदा कोरोना योध्दे, राजदूत, केंद्रीय मंत्री, राजकीय नेते, अधिकारी, विद्यार्थी व पत्रकार मिळून चार हजार लोकांनाच प्रवेशपत्रे देण्यात आली होती.  दरवर्षी ही संख्या 15 हजारांच्या आसपास असते. 

दिल्लीत अनलॉक-3 चे दिशानिर्देश लागू असल्याने सोशल डिस्टन्सिंगसह अन्य आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. दोन खुर्च्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त अंतर ठेवण्यात येईल. यंदाच्या सोहळ्यात प्रथमच दिल्ली पोलिसांचा बँड वाजणार नाही. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देणाऱ्या पोलिसांना 15 दिवसांपासून अत्यंत कडेकोट विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांची नियमित आरोग्य तपासणीही केली जात आहे. लाल किल्ला परिसरातही रूग्णवाहिका व डॉक्‍टरांची नेहमीपेक्षा जास्त पथके तैनात होती.

राष्ट्रपती भवनात आज सायंकाळी होणाऱ्या स्नेहमिलन कार्यक्रमात राष्ट्रपती व पंतप्रधानांसह देशाचे संपूर्ण मंत्रिमंडळ यात सहभागी होणार आहे. मात्र, यंदा कोरोनाचा प्रकोप सुरू असल्याने नेहमीच्या तुलनेत फक्त 10 टक्के आमंत्रितांनाच यासाठी बोलावण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नेहमी किमान 100 देशांच्या राजदूतांना मिमंत्रण असते. मात्र यंदा फक्त 10 टक्के म्हणजे 10 राजदूतांनाच बोलावले आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com