गेहलोत-पायलट वाद अखेर मिटला; कुमारी शैलजांची मध्यस्थी यशस्वी

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादावर अखेर तोडगा निघाला आहे.
kumari sailaja meet congress party chief sonia gandhi
kumari sailaja meet congress party chief sonia gandhi

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वादावर अखेर तोडगा निघाला आहे. या वादात काँग्रेसच्या (Congress) हरियाणा प्रदेशाध्यक्षा कुमारी शैलजा (Kumari Sailaja) यांची मध्यस्थी यशस्वी झाली आहे. यामुळे राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडेही अखेर मार्गी लागले आहे. 

हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षा कुमारी शैलजा या नुकत्याच जयपूरमध्ये आल्या होत्या. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विशेष दूत म्हणून त्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्या दिल्लीला परतल्या होत्या. दिल्लीत त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती. त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला सोनिया गांधींच्या समोर मांडला. याला सोनियांनी ग्रीन सिग्नल दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला आहे. राजस्थानध्ये मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला होती. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रस्तावावर दोन्ही नेत्यांची सहमती झाल्याचे समजते. 

राज्यातील काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला होता. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी अज माकन हे नुकतेच राज्यात  दाखल झाले होते. त्यांची गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. यातच सिद्धू यांचे बंड पंजाबमध्ये यशस्वी पायलट यांनी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com