karnataka former cm yediyurappa supporter mlas not get cabinet berth
karnataka former cm yediyurappa supporter mlas not get cabinet berth

बोम्मईंची डोकेदुखी वाढली; मंत्रिपद न मिळाल्याने येडियुरप्पांचे समर्थक आमदार नाराज

कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी यावरुन गदारोळ सुरुच आहे. यामुळे नवीन मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकात (Karnataka) मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी यावरुन गदारोळ सुरुच आहे. यात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांचे (B. S.Yediyurappa) पुत्र बी.वाय.विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांच्यासह अनेक समर्थकांचा समावेश नाही. यामुळे येडियुरप्पांचे समर्थक आमदार आता उघड नाराजी व्यक्त करु लागले आहेत. या सर्व घडामोडींमुळे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची डोकेदुखी वाढली आहे. 

कर्नाटकात नुकताच मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यावेळी 29 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात 7 ओबीसी, 3 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 8 लिंगायत, 1 रेड्डी आणि 1 महिला आहे. मंत्रिमंडळात 6 नवीन चेहरे आहेत. यात येडियुरप्पांच्या समर्थकांना डावलण्यात आल्याने राजकारण तापू लागले आहे. यातील अनेक समर्थकांनी येडियुरप्पांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नाराज नेत्यांमुळे बोम्मई यांची डोकेदुखी वाढली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरापुराचचे आमदार राजूगौडा, हिरीयूरचे आमदार पूर्णिमा श्रीनिवास आणि एम.पी. रेणुकाचार्य यांनी नुकतीच येडियुरप्पांची भेट घेतली. त्यावेळी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने या सर्व नेत्यांना येडियुप्पासमोर अश्रू अनावर झाले. येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळात तीन उपमुख्यमंत्री होते. यात सी.एन.अश्वथ नारायण, गोविंद करजोळ आणि लक्ष्मण सवदी यांच्या समावेश होता. नव्या मंत्रिमंडळात नारायण आणि करजोळ यांचा समावेश आहे. मात्र, सवदी यांना डच्चू मिळाला आहे. सवदी हे आधी परिवहन मंत्रीही होते. विशेष म्हणजे नव्या मंत्रिमंडळात एकही उपमुख्यमंत्री नाही. 

येडियुरप्पांनी पुत्राच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला होता. परंतु, पक्ष नेतृत्वाने याला महत्व दिले नव्हते. येडियुरप्पांचे पुत्र बी.वाय. विजयेंद्र यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नसल्याचे खुद्द बोम्मई यांनीच जाहीर केले होते. येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना विजयेंद्र हे सुपरसीएम असल्याची टीका मंत्रिमंडळातील सहकारी करीत होते. मुलामुळेच येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला, अशीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विजयेंद्र यांनी वगळून पक्ष नेतृत्वाने येडियुरप्पांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी येडियुरप्पांशी चर्चा केली होती. याचबरोबर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनी खुद्द विजयेंद्र यांच्याशी चर्चा केली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com