येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपद सोडले तरी रूबाब कॅबिनेट मंत्र्याचाच राहणार!

कर्नाटकात बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचाराजीनामा दिला होता. त्यांच्या जागी बसवराज बोम्मई हे मुख्यमंत्री झाले आहेत.
karnataka state will provide all cabinet minister facilities to yediyurappa
karnataka state will provide all cabinet minister facilities to yediyurappa

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister) राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) हे मुख्यमंत्री झाले आहेत. येडियुरप्पा हे माजी मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना रूबाब कॅबिनेट मंत्र्यांचाच राहणार आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने आज काढला आहे.  

येडियुरप्पा हे आता माजी मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना कॅबिनेट मंत्र्यांसारखी वागणूक मिळणार आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. बोम्मई हे राज्याचे मुख्यमंत्री असेपर्यंत येडियुरप्पांना कॅबिनेट मंत्र्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळणार आहेत. येडियुरप्पांना नाराज न करण्याची भूमिका भाजप नेतृत्वाने सुरवातीपासून घेतली आहे. यामुळेच त्यांचे निकटवर्तीय बोम्मई हे मुख्यमंत्री झाले. आता त्यांना कॅबिनेट मंत्र्यांच्या सर्व सुविधा देऊन पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने ते नाराज होऊ नयेत, याची काळजी घेतली आहे. 

राज्यातील भाजप (BJP) सरकारच्या द्विवर्षपूर्ती दिवशीच येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांना अश्रू आवरता आले नव्हते. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. 

येडियुरप्पा हे 78 वर्षांचे आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाकडून पावले उचलण्यास सुरवात झाली होती. येडियुरप्पा यांना त्यासाठी दिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली होती. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते. 

बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाची थपथ घेतल्यानंतर आठवडाभराने मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यावेळी 29 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात 7 ओबीसी, 3 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 8 लिंगायत, 1 रेड्डी आणि 1 महिला आहे. मंत्रिमंडळात 6 नवीन चेहरे आहेत. बोम्मई यांनी आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com