मला हे मंत्रिपदच नको! नाराज मंत्र्याचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर झाले आहे. यावरुन आता वाद सुरू झाला आहे.
karnataka minister anand singh complains about portfolio
karnataka minister anand singh complains about portfolio

नवी दिल्ली : नवी दिल्ली : कर्नाटकात (Karnataka) मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले असले तरी यावरुन गदारोळ सुरुच आहे. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अनेक आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करतआहेत. यातच मंत्रिपद मिळालेल्या नेत्याने कमी महत्वाचे खाते मिळाल्याने पदच नको, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांची डोकेदुखी वाढली आहे. 

बोम्मई यांनी आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. आनंद सिंह यांच्याकडे पर्यावरण विभाग देण्यात आला. यावरुन आनंद सिंह हे नाराज झाले आहेत. सिंह हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. देशातील सर्वांत श्रीमंत राजकारण्यांपैकी ते एक आहेत. राज्यातील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडणाऱ्या 17 आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्या नंतर येडियुरप्पांनी त्यांचा मंत्रिमंडात समावेश केला होता. 

आता खातेवाटपावरुन सिंह यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वासह मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी हे मागितले नव्हते. मी पक्षाच्या नेतृत्वाकडे केलेल्या मागणीवर विचार करण्यात आलेला नाही. मी मुख्यमंत्र्यांना आता भेटणार आहे. त्यांनी माझ्या मागणीवर विचार करावी, अशी विनंती मी करणार आहे. 

मुख्यमंत्र्यांनी अर्थ, बंगळूर विकास आणि मंत्रिमंडळ कामकाज यासह महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. बी.एस. येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळात आधी असलेले ज्येष्ठ नेते के.एस.ईश्वरप्पा यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज विकास खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. आर.अशोक यांच्याकडे महसूल, बी.श्रीरामुलू यांच्याकडे परिवहन व अनुसूचित जमाती कल्याण खाती सोपवण्यात आली आहेत. लिंगायत नेते व्ही.सोमण्णा यांच्याकडे गृहनिर्माण, पायाभूत विकास तर प्रभू चव्हाण यांच्याकडे पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालेले अरगा ज्ञानेंद्र आता गृह खाते सांभाळतील. गोविंद मक्तप्पा करजोळ यांच्याकडे मोठे व मध्यम सिंचन खाते देण्यात आले आहे. मुरुगेश निरानी यांनी मोठे व मध्य उद्योग आणि उमेश कत्ती यांनी वन व नागरी पुरवठा खाते सोपवण्यात आले आहे. डॉ.के.सुधाकर यांच्याकडी आरोग्य खाते आणि डॉ.अश्वत नारायण यांच्याकडील उच्च शिक्षण खाते कायम ठेवण्यात आले आहे.  

कर्नाटकात नुकताच मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यावेळी 29 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात 7 ओबीसी, 3 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 8 लिंगायत, 1 रेड्डी आणि 1 महिला आहे. मंत्रिमंडळात 6 नवीन चेहरे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com