karnataka elections 2024 bjp candidate list
karnataka elections 2024 bjp candidate list Sarkarnama

Karnataka Elections : भाजपकडून ५२ नव्या चेहऱ्यांना संधी ; नऊ डॉक्टर, पाच वकील, दोन सनदी अधिकारी रिंगणात..

karnataka elections 2024 bjp candidate list : दिल्लीमध्ये भाजपाची चार दिवसांपासून बैठक सुरू होती.

karnataka elections 2024 bjp candidate list : येत्या १० मे रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. बहुचर्चित भाजपची पहिली यादी काल (मंगळवारी) रात्री जाहीर करण्यात आली. उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी दिल्लीमध्ये भाजपाची चार दिवसांपासून बैठक सुरू होती.

११ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले ..

मंगळवारी रात्री केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रसाद यांनी ही यादी जाहीर केली आहे. यात भाजपने ५२ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ११ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे. ८ महिला उमेदवार आहेत. नऊ डाँक्टर, पाच वकील, दोन सनदी अधिकारी रिंगणात आहे.

karnataka elections 2024 bjp candidate list
Maharashtra Politics : 'मातोश्री' वर चाललयं काय ? ; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याची घरवापसी ?

येदियुरप्पा यांच्या मुलाला तिकीट

माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पाचे सुपुत्र बीवाई विजयेंद्र यांना शिकारीपुर विधानसभेतून रिंगणात उतरणार आहेत. येदियुरप्पांचा या मतदारसंघ आहे. तर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना शिगगांव येथून निवडणूक लढणार आहेत.

karnataka elections 2024 bjp candidate list
BJP News : भाजपमध्ये इनकमिंग सुरूच ; अकाली दल, अन्नाद्रमुकचे नेते भाजपमध्ये...

विद्यमान मंत्र्यांना तिकीट

राज्यमंत्री बी श्रीरामुलु बेल्लारी ग्रामीण येथून लढणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव सीटी रवि आपल्य चिकमगलूर येथून, आरोग्यमंत्री डाँ. सुधाकर चिक्काबालापूर येथून, तर मंत्री डाँ. अश्वथनारायण हे मल्लेश्वरम येथून निवडणूक लढत आहेत.

३२ ओबीसी, ३० अनुसूचित जातीचे उमेदवार

भाजपच्या पहिल्या यादीत ३२ ओबीसी उमेदवार, ३० अनुसूचित जाती (SC) उमेदवारा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर १६ अनुसूचित जनजातीचे (ST) उमेदवार आहेत. कर्नाटक सरकारचे मंत्री आर अशोक हे दोन जागांवर नशिब अजामवत आहेत. ते पद्दनाभनगर आणि कनकपुरा येथून लढत आहेत. कनकपुरा येथून ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके के शिवकुमार यांच्या विरोधात लढत नाही.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com