भारतातील रुग्णसंख्या कमी होतेय हा केवळ भ्रम; 'डब्लूएचओ'सह जागतिक तज्ञांचा धोक्याचा इशारा

देशातील कोरोनाचा कहर कायम असला तरी रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होऊ लागली आहे. मात्र, रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अजूनही जास्त आहे.
india reports lower covid cases but world health organization warns about rural numbers
india reports lower covid cases but world health organization warns about rural numbers

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच असली तरी या वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. देशात 21 एप्रिलनंतर प्रथमच नवीन रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) तज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत धोक्याचा इशारा दिला आहे.  

'डब्लूएचओ'च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे की, देशातील अनेक भागात अजून कोरोनाची लाट उच्चांकी पातळीवर पोचलेली नाही. त्या ठिकाणी अद्याप आकडे वाढत आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र देशात दिसत आहे. असे असले तरी ग्रामीण भागात वेगाने संसर्ग वाढत असून, तेथे चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. भारतात आढळणारा कोरोना विषाणूचा बी.1.617 हा प्रकार अधिक संसर्गदायी आहे. तो भारतासह जगभरात वेगाने पसरत आहे. त्यामुळे संसर्गाची लाट टोकाला पोचली आहे की नाही हे आताच सांगता येणार नाही. 

भारतात पॉझिटिव्हीटी दर 20 टक्के आहे. एकूण होणाऱ्या चाचण्यांमधील हा दर आहे. अद्याप चाचण्या पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाहीत. तुम्ही जास्त पॉझिटिव्हीटी दर पाहता त्यावेळी चाचण्या पुरेशा नाहीत, असे स्पष्ट होते. रुग्णसंख्येच्या एकूण आकड्यापेक्षा किती चाचण्या केल्या आणि त्यातील किती पॉझिटिव्ह आले, याची तुलना करायला हवी, असे स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले. 

रुग्णसंख्येतील घसरण हा भ्रम 
अमेरिकेती मेयो क्लिनिकमधील प्राध्यापक एस.व्हिन्सेंट राजकुमार म्हणाले की, भारतातील रुग्णसंख्या घटतेय हा एक भ्रम आहे. भारतातील कोरोनाच्या पहिल्या लाटेने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात टोक गाठले होते. ती प्रामुख्याने शहरी भागात होती. आता दुसरी लाट फेब्रुवारीमध्ये आली. ती ग्रामीण भागात अतिशय वेगाने पसरली आहे. देशातील दोन-तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. तेथे चाचण्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येचे आकडे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. 

देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख  81  हजार 386 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 106 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 74 हजार 390 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com