बँकांवर मोठं संकट : हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचा कोरोनाने घेतला बळी

देशातील कोरोनाचा कहर कायम असून, याचा मोठा फटका बँकिंग व्यवस्थेला बसू लागला आहे.
banks have lost more than one thousand employees to covid 19
banks have lost more than one thousand employees to covid 19

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19)  कहर कायम असून, याचा मोठा फटका बँकिंग (Banks) व्यवस्थेला बसला आहे. सर्वसामान्यांसह सर्वच नागरिकांसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या बँका कोरोना संकटाच्या काळात सेवा देत आहेत. कोरोनाचा मोठा फटका बँकिंग सेवेतील कर्मचाऱ्यांना (Bank Employees) बसला असून, आतापर्यंत सुमारे 1  हजार 200 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू (Covid Deaths) झाला आहे. 

देशभरात अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन आणि निर्बंध लागू असले तरी बँका या अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू आहेत. बँकिंग कामकाज 50 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. बँकिंग व्यवस्था कोलमडून जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण बँक कर्मचाऱ्यांमध्ये अधिक आहे. यासाठी बँक कर्मचाऱ्यांना कोरोना लस प्राधान्याने द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 

याविषयी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सी.एच.वेंकटचलम म्हणाले की, आतापर्यंत सुमारे 1 हजार 200 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांबद्दल माहिती देण्यास अनेक बँका पुढे येत नाहीत. तसेच, बँकांकडून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईबद्दलचे धोरणही जाहीर करण्यात आलेले नाही. 

हेही वाचा : भारतात 27 दिवसांत पहिल्यांदाच असं घडलं...

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस एस. नागराजन म्हणाले की, आम्ही आमचे एक हजार सहकारी आतापर्यंत कोरोनामुळे गमावले आहेत. बँक कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर असून, त्यांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. 

देशात 24 तासांत कोरोनामुळे 4 हजार 106 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख  81  हजार 386 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 106 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 74 हजार 390 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com