देशात सलग सहाव्या दिवशी रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली पण...दर तासाला 174 मृत्यू

देशातील कोरोना रुग्णसंख्या आज सलग सहाव्या दिवशी तीन लाखांच्या खाली राहिली आहे. असे असले तरी जगात रोजचे सर्वाधिक कोरोना मृत्यू भारतात होत आहेत.
india records below 3 lakhs covid cases for six consecutive days
india records below 3 lakhs covid cases for six consecutive days

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्या (Patients) आज सलग सहाव्या दिवशी तीन लाखांच्या खाली राहिली आहे. असे असले तरी जगात रोजचे सर्वाधिक कोरोना मृत्यू  (Covid Deaths) भारतात होत आहेत. देशात मागील 24 तासांत 2 लाख 57 हजार 299 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 194 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडलेल्या रुग्णांची संख्या साडेतीन लाखाहून अधिक आहे.  

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 62 लाख 89 हजार 290 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 95 हजार 525 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  देशातील रोजची रुग्णसंख्या 26 दिवसांनंतर पहिल्यांदाच 17 मेपासून 3 लाखांच्या खाली आली आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच वेगाने रुग्णसंख्येत होणारी वाढ आता कमी होऊ लागली आहे. यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचे सूर सरकारमधून व्यक्त होत आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, आता ती 29 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 29 लाख 23 हजार 400 आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 87.25 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 30 लाख 70 हजार 365 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.12 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com