Pramod Sawant News : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अडचणीत वाढ; बिहारमध्ये गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Crime News : गोव्यात सर्व राज्यातील कामगार...
CM Pramod Sawant Latest News
CM Pramod Sawant Latest NewsSarkarnama

Goa : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १ मेच्या भाषणात गोव्यातील बहुतांश गुन्हे हे यूपी-बिहारमधील लोक करतात. गोव्यातील 90 टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांमध्ये येथील परप्रांतीय असलेल्या बिहारमधील मजुरांचा सहभाग असतो असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. आता त्यांच्या याच वक्तव्यामुळे सावंत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडचे नेते मनिष सिंह(Manish Sinh) यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पाटणा पोलिसांनी सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचवेळी सिंह यांनी मुख्यमंत्री सावंत यांनी बिहारमध्ये येऊन आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बिहारींची माफी मागावी अशी मागणीही सिंह यांनी केली आहे.

CM Pramod Sawant Latest News
Kailas Patil Statement: ''धाराशिवमधला हा आमचा शेवटचा पराभव आणि त्याचा वचपा...''; कैलास पाटलांनी दंड थोपटलं

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री सावंत काय म्हणाले?

बिहार (Bihar)मधील पाटणा येथे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत(Pramod Sawant)यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावर सावंत म्हणाले,"माझं भाषण कोकणी भाषेतून झालं होतं. माझ्या भाषणाला काही राजकीय लोकांनी, नेत्यांनी मोडून तोडून करुन सांगितलं आहे. मला वाटतंय, माझ्या भाषणाचा व्हिडीओ त्यांनी पुन्हा एकदा ऐकावा आणि कोकणी भाषा समजून घ्यावी असंही सावंत म्हणाले.

CM Pramod Sawant Latest News
Sharad Pawar News : 'लोक माझे सांगाती'तून पवारांनी ठाकरेंच्या आरोपांमधील हवाच काढली..; ठाकरे गटाला उघडं पाडलं..

परप्रांतीय कामगारांकडून गुन्हा घडला तर...

गोव्या(Goa) त सर्व राज्यातील कामगार आहेत. अशा राज्याबाहेरील कामगारांसाठी आमच्या सरकारनं लेबर कार्ड ही योजना आणली आहे. गोव्यात गुन्हा घडता कामा नये. गुन्हा घडल्यास गुन्हेगारांना शोधणं सोपं जावं यासाठी लेबर कार्ड उपयोगी ठरणार आहे. या विषयीच बोलताना मी परप्रांतीय, स्थलांतरीत कामगारांबाबत वक्तव्य केलं होतं असंही स्पष्ट मत सावंत यांनी केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com