Goa Politics : ममता बॅनर्जींना दुसरा झटका: TMC नेते फालेरो यांचा राज्यसभेचा राजीनामा

Goa Politics | पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व फालेरो यांच्यावर नाराज होते
Goa Politics
Goa Politics Sarkarnama

Goa Politics : तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांनी राजीनामा दिला आहे. राज्यसभेने लुइझिन फालेरो यांचा राजीनामा राज्यसभेने स्वीकारला आहे. गोव्यातील पक्षाच्या कामकाजापासून बराच काळ दूर राहिल्यामुळे टीएमसीच्या पदाधिकाऱ्यांकडून फालेरो यांचा राजीनामा मागितला जात होता. हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी दुसरा धक्का मानला जात आहे. (TMC leader Falero resigns from Rajya Sabha)

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, फालेरो यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांच्याविरोधात फातोर्डा येथून लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व फालेरो यांच्यावर नाराज होते. 2022 च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन, TMC ने राज्यसभा खासदार अर्पिता घोष यांचा राजीनामा मागून 2021 मध्ये फालेरो यांना राज्यसभेवर पाठवले होते. अर्पिता घोष यांचा कार्यकाळ 2026 पर्यंत होता.

Goa Politics
Satyajeet Tambe News : नाशिकला मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारणार!

लुइझिन फालेरो यांनी 2021 मध्ये काँग्रेस सोडून त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच वर्षी 15 सप्टेंबर रोजी अर्पिता घोष यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. 29 सप्टेंबर रोजी लुइझिन फालेरो यांनी कोलकाता येथे तृणमूलचे अखिल भारतीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्याशी हातमिळवणी करून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

फेब्रुवारी २०२२ मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूलच्या पराभवानंतर ते पक्षापासून दुरावले होते. गोवा तृणमूलच्या राज्य समितीतही त्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना जागा न दिल्याने ते नाराज असल्याचेही बोलले जात होते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in