अफगाणिस्तानात मोठी घडामोड : माजी उपाध्यक्षांचा अध्यक्षपदावर दावा...तालिबानला धुडकावलं 

तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळाले आहेत.
I am the legitimate caretaker President of Afghan says Amrullah Saleh
I am the legitimate caretaker President of Afghan says Amrullah Saleh

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता स्थापनेचा दावा केलेला असतानाच पुन्हा एकदा सत्तासंघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानचे पहिले व माजी उपाध्यक्ष अमरूल्ला सालेह यांनी आपण सध्या देशाचे काळजीवाहू अध्यक्ष असल्याचं घोषित केलं आहे. त्यांनी अद्याप तालिबानसमोर गुडघे टेकवले नसल्याचं स्पष्ट केलं आहे.  (I am the legitimate caretaker President of Afghan says Amrullah Saleh)

तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) देश सोडून पळाले आहेत. ते जाताना चार कार आणि हेलिकॉप्टरमध्ये पैसे भरून नेले. त्यातही पैसे न बसलेले पैसे ते तेथेच सोडून गेल्याचे वृत्त रशियाच्या 'आरआयए' वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यानंतर दोन दिवस तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केल्याचं जाहीरही केलं आहे. पण मंगळवारी रात्री मोठी घडामोड घडली. 

सालेह यांनी ट्विट करून आपण सध्या देशाचे काळजीवाहून अध्यक्ष असल्याचं जाहीर केलं आहे. अफगाणिस्तानमधील घटनेनुसार अध्यक्षाच्या अनुपस्थितीत किंवा त्यांना पलायन केलं, राजीनामा दिला किंवा त्यांचा मृत्यू झाला असल्यास पहिले उपाध्यक्ष आपोआप काळजीवाहून अध्यक्ष बनतात. मी सध्या आपल्या देशातच असून कायदेशीरणे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून आहे. मी सर्व नेत्यांच्या समर्थनासाठी संपर्क साधत आहे, असं सालेह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

जो बायडेन यांच्यावरही केली टीका

सालेह यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही टीका केली आहे. आता अफगाणिस्तानविषयी जो बायडेन यांच्याशी चर्चा करणे वायफळ आहे. त्यांना जाऊ द्या. अफगाणिस्तान व्हिएतनाम नाही, हे आम्हाला अफगाणींना सिध्द करून दाखवावं लागेल. तसेच तालिबानीही व्हिएतनामी कम्यूनिस्टांप्रमाणे नाहीत. यूएस-नाटोप्रमाणे आम्ही हिंम्मत हारलेलो नाही.  आता प्रतिकार करण्यासाठी सहभागी व्हा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

दरम्यान, अफगाणिस्तानमधून पळालेले घनी ताजिकिस्तानमध्ये आश्रयास गेले होते. तेथे त्यांच्या विमानास उतरण्यास नकार मिळाला. ताजिकीस्तानचे दरवाजे बंद झाल्याने घनी हे ओमानमध्ये तात्पुरते आश्रयास गेले आहेत. ते तेथून अमेरिकेत जाण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यासमोर आश्रयासाठी शेवटचा पर्याय अमेरिकाच आहे. दरम्यान, देशाला संकटात वाऱ्यावर सोडून घनी पळाल्याने त्यांच्या विरोधात जनतेत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com