फक्त दहा रुपयांत कोरोना रुग्णांवर उपचार करणारा अवलिया डॉक्टर

हैदराबादमधील एक डॉक्टर या महागाईच्या काळातही कोरोना रुग्णांवर केवळ दहा रुपयांत उपचार करीत आहेत. एवढंच नव्हे तर हे डॉक्टर जवांनावर मोफत उपचार करतात.
hyderbad doctor treats covid patients for only 10 rupees
hyderbad doctor treats covid patients for only 10 rupees

हैदराबाद : देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यात अनेक वेळा खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करीत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. परंतु, हैदराबादमधील एक डॉक्टर या महागाईच्या काळातही कोरोना रुग्णांवर केवळ दहा रुपयांत उपचार करीत आहेत. एवढंच नव्हे तर हे डॉक्टर जवांनावर मोफत उपचार करतात.  

हैदराबादमधील डॉ. व्हिक्टर इमॅन्युएल हे तीन वर्षांपासून गरीब रुग्णांकडून केवळ दहा रुपये शुल्क घेऊन उपचार करतात. सध्या कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालये लाखो रुपये आकारत आहेत. अशा परिस्थितीत हे डॉक्टर केवळ दहा रुपयांतच गरीब रुग्णांना कोविडवरील उपचार करीत आहेत. शहरातील उप्पल डेपोजवळ त्यांचे क्लिनिक असून, डॉक्टर हे पांढरे रेशन कार्ड अथवा अन्न सुरक्षा कार्ड असलेल्या लोकांना दहा रुपये तर जवानांवर मोफत उपचार करत आहेत. 

याबाबत बोलताना डॉ. इमॅन्युएल म्हणाले की, गरिबांची सेवा करता यावी यासाठी मी उपचाराचे शुल्क दहा रुपये ठेवले आहे. मागासलेले घटक आणि पांढरे शिधापत्रिकाधारक आणि अन्न सुरक्षा कार्ड असणाऱ्यांसाठी हे शुल्क आहे. तसेत, शेतकरी, ॲसिड हल्ल्याला बळी ठरलेले नागरिक, जवान, अनाथ, दिव्यांग आणि त्यांच्या कुटुंबीयांना देखील माफक दरात सेवा देण्यात येत आहे. विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या आणि औषधांच्या किमतीही कमी ठेवल्या आहेत. 

डॉ. इमॅन्युएल हे मधुमेह, हृदयविकार यांच्यासह अन्य आजारावरही उपचार करतात. कोरोना महामारीच्या काळात खासगी रुग्णालये लाखो रुपयांचे बिल आकारत आहेत. मात्र, डॉ. इमॅन्युएल हे कोरोना रुग्णांवर केवळ दहा रुपयात उपचार करतात. याचबरोबर ते रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्यासही मदत करतात. याआधी दररोज ते सुमारे शंभर रुग्णांवर उपचार करीत होते. आता कोरोनामुळे रुग्णसंख्या वाढली असून, ते दररोज १४० रुग्णांवर उपचार करतात. गेल्या वर्षभरात  त्यांनी 20 ते २५ हजार कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत. 

डॉ.इमॅन्युएल माफक दरात उपचार सुरु करण्यास त्यांच्या आयुष्यातील एक घटना कारणीभूत ठरली. एक महिला रुग्णालयासमोर उपचारासाठी पैसे नसल्याने भीक मागत असल्याचे त्यांना दिसले. तिच्या पतीवर आयसीयूत उपचार सुरू होते. या घटनेने डॉक्टरांच्या आयुष्यावर मोठा परिणाम केला. त्यानंतर त्यांनी कमी पैशात रुग्णांवर उपचार करण्याचे ठरवले. 

रुग्णांकडून दहा रुपये शुल्क घेण्याबाबत डॉक्टर म्हणाले की,  अनेक जण विचारतात दहा रुपये घेण्यापेक्षा मोफत उपचार का करत नाही. दहा रुपये घेण्यामागील कारण म्हणजे रुग्णाच्या मनात दयेपोटी आपल्यावर उपचार करत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. रुग्णांचा आत्मसन्मान कायम ठेवण्यासाठी दहा रुपये महत्त्वाचे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com