लग्न पडलं महागात...वर-वधूसह 100 जण पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू

देशात कोरोना संसर्गाची लाट आली आहे. ही रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंधांसह लॉकडाउन लावण्यात आला आहे. तरी याचे उल्लंघन होत आहे.
hundred persons found covid positive after attending wedding function
hundred persons found covid positive after attending wedding function

नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid19) संसर्गाची लाट आली आहे. ही रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंधांसह लॉकडाउन (Lockdown) लावण्यात आला आहे. कोरोना महामारीचे संकट असतानाही लग्न समारंभाला (Wedding) हजर राहणे चांगलेच महागात पडल्याचा प्रकार समोर आला आहे. एका लग्न समारंभाला उपस्थित शंभर जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. वर आणि वधूलाही कोरोना संसर्ग झाला आहे. 

तेलंगणमधील खम्मन जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका लग्नाला हजेरी लावल्यानंतर तब्बल 100 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच, लग्नाला उपस्थित चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वरपित्याचाही समावेश आहे. तेलंगणमध्ये लग्नासाठी फक्त 40 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. या लग्नाला मात्र, 250 जण उपस्थित होते. लग्नात कुणीही मास्क घातले नव्हते तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालनही केले नव्हते. 

सुरवातीला या लग्नाला उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला लक्षणे जाणवू लागल्याने त्याने कोरोना चाचणी केली. त्यावेळी त्याच्याकडे विचारणा करण्यात आली. नंतर त्याने लग्नाबाबत सांगितले. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. लग्न झाले त्या गावात तातडीने कोरोना तपासणी सुरू करण्यात आली. वर आणि वधू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना आता कुटुंबीयांसमवेत विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

सरकारने निर्बंध घातलेले असताना लोक ते धुडकावून लग्न समारंभ करीत आहेत. ठराविक संख्येपेक्षा जास्त गर्दीचे लग्न समारंभ झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. याआधी निजामाबाद जिल्ह्यातील हनमाजीपेठ येथे नुकताच एक लग्न समारंभ झाला. त्याला तब्बल 400 जण उपस्थित होते. नंतर यातील 90 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. 

देशात कोरोनामुळे 24 तासांत 3 हजार 617 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 1 लाख  73  हजार 790 नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 617 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 77 लाख 29 हजार 247 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 लाख  22 हजार 512 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 45 दिवसांत पहिल्यांदाच एवढी कमी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. देशातील रुग्णसंख्या 25 मेपासून 2 लाखांच्या खाली आली आहे. असे असले तरी मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in