मुलगा मरुन 30 दिवस झाले तरी पोलीस तक्रार घेत नाहीत! यूपीतील भाजप आमदाराची व्यथा

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत उत्तर प्रदेशातील विदारक परिस्थिती रोज नव्याने समोर येत आहे.
uttar pradesh bjp mla says police did not register his complaint from last 3o days
uttar pradesh bjp mla says police did not register his complaint from last 3o days

हरडोई : देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विदारक परिस्थिती रोज नव्याने समोर येत आहे. अनेक जणांनी अंत्यसंस्कारासाठी पैसै नसल्याने कोरोनाबाधित नातेवाईकांची प्रेते गंगेत सोडून दिल्याच्या घटना राज्यात घडल्या होत्या. आता उत्तर प्रदेशातील भाजप (BJP) आमदाराच्या (MLA) मुलाचा मृत्यू होऊनही पोलीस (Police) तक्रारच घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

भाजपचे हरडोई जिल्ह्यातील आमदार राजकुमार अगरवाल यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यांच्या 35 वर्षीय तरुण मुलगा कोरोनामुळे 26 एप्रिलला मृत्यू झाला. त्याच्यावर काकोरी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार घेऊन आमदार पोलिसांकडे गेले होते. अद्याप 30 दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी त्यांची तक्रार घेतलेली नसून, कोणतीही कार्यवाही केलेली नाही. 

याविषयी आमदार अगरवाल म्हणाले की, माझ्या मुलाची ऑक्सिजन पातळी 26 एप्रिलला सकाळी 94 होती. तो व्यवस्थित खात होता आणि सगळ्यांशी व्यवस्थितपणे बोलू शकत होता. त्यादिवशी सायंकाळी अचानक मुलाची तब्येत खराब झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याची ऑक्सिजन पातळी घसरत असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे मी बाहेरुन ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मला ऑक्सिजन सिलिंडर घेऊन आतमध्ये जाऊ दिले नाही आणि माझ्या मुलाचा अखेर मृत्यू झाला. 

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय व्यवस्थापन आणि डॉक्टर हे माझ्या मुलाच्या मृत्यूस जबाबदार आहेत. माझ्या मुलाला न्याय मिळावा यासाठी मी पोलिसांकडे धाव घेतली. अनेकवेळी पोलिसांकडे हेलपाटे मारूनही त्यांनी एफआयआर दाखल केला नाही. मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक या सर्वांकडे तक्रार केली तरीही पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेतली नाही. माझी एकच मागणी आहे की, पोलिसांनी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि माझ्या मुलाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करावी, असे अगरवाल यांनी सांगितले. 

देशात कोरोनामुळे 24 तासांत 3 हजार 617 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 1 लाख  73  हजार 790 नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 617 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 77 लाख 29 हजार 247 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 लाख  22 हजार 512 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 45 दिवसांत पहिल्यांदाच एवढी कमी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. देशातील रुग्णसंख्या 25 मेपासून 2 लाखांच्या खाली आली आहे. असे असले तरी मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com